अतिक्रमण धारकाकडून खर्च वसूल करणार
वाडी(नागपूर)/अरुण कराळे:
गेल्या कित्येक वर्षांपासून ग्रामपंचायत प्रशासन असताना खडगांव मार्गावर विविध व्यवसायिकांनी वेगवेगळी छोटी-मोठी अगदी रस्त्याच्या बाजूला दुकाने थाटून आपला व्यवसाय सुरू केला होता.परंतु दिवसेंदिवस वाढती लोकवस्ती त्यामुळे रहदारीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत गेली.याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर पडून रहदारीची समस्या निर्माण झाली होती,साधारणतः सायंकाळी ५ ते ७ च्या दरम्यान संपूर्ण रस्ता वाहतुकीच्या वर्दळीमूळे जाम होऊन बऱ्याचदा अपघातही घडले.
वाडी नगर परिषद प्रशासनाने महाराष्ट्र नगर पालिका,नगर पंचायती व औधिगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १७९ , १८० , १८१ , व १८२ चे अंतर्गत संबंधित अतिक्रमण धारकांना स्वखर्चाने अतिक्रमण काढून तीन दिवसात जागा पूर्वरत करण्याची नोटीस पाठवूनही संबंधित अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण न काढल्याने नगर परिषद यंत्रणेद्वारे नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी आकाश साहरे यांच्या मार्गदर्शनात, अभियंता रामकृष्ण कुंभारे,चेतन तुरणकर, प्रमोद निकाजू,अविनाश चौधरी,अश्वलेखा भगत, बोरकर ,संदीप अढाऊ,धनंजय गोतमारे,भारत ढोके,शैलेश आदिवडेकर,मनोहर वानखेडे,रोहित शेलारे,यांच्या उपस्थितीत अतिक्रमण काढण्यात आले .
काही अतिक्रमण धारकांनी आम्हाला कोणत्याही प्रकारची नोटीस दिली नसता अतिक्रमण काढण्याचा विरोध करीत शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना न जुमानता काही भागातील अतिक्रमण काढण्यात आले