आरोपीच्या वकिलांनी प्रकरणातून घेतली माघार
नागपूर/ प्रतिनिधी बहूचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांड प्रकरणात आज दिनांक 15 फेब्रुवारी 2019 रोजी मा.जिल्हा सत्र न्यायालय नागपुर ने आरोपी विरुद्ध " चार्ज फ्रेम " करून खटला सुरू केला..
अधिक पोलीस बंदोबस्तात आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले तसेच गुन्ह्यातील जामिनावर असलेला नाबालिक आरोपी न्यायालयात हजर झाला. सर्व चारही आरोपीना माननीय न्यायाधीश श्री. ए. एस. काझी साहेब यांनी आरोपींवर लावलेले आरोप सांगितले व त्या अनुषंगाने सर्व आरोपींना गुन्हा कबुल आहे का ? असे विचारण्यात आल्यावर आरोपींनी गुन्हा कबुल नसल्याचे उत्तर दिले .
सर्व आरोपींवर कलम 302, 394,364,201, 120(ब),34 भा.द.वी. व एट्रोसिटी कलम( 3)(2)(5) च्या अंतर्गत आरोपीं विरुद्ध चार्ज फ्रेम केला व प्रोग्राम फिक्सिंग करीता 1 मार्च 2019 ही तारीख ठेवण्यात आली .
आरोपींचा वकील देवेंद्र चव्हाण यांनी अर्ज दाखल करून प्रकरणातून घेतला माघार
आज न्यायालयात चार्ज फ्रेमिंग च्या ऐन वेळी आरोपींच्या वकिलांनी केस मधुन वकालत नामा परत घेण्याकरिता अर्ज दाखल केल्या नंतर न्यायालयात अचानक खळबळ झाली व सगळ्यांमध्ये अशी चर्चा होऊ लागली की चार्ज फ्रेमिंग टाळन्याकरिता हे पाऊल घेण्यात तर आले नाही ?
माननीय न्यायाधीश श्री ए. एस. काझी साहेब यांनी आरोपींना पुर्ण पणे कायदेशीर संधी देऊन *चार्ज फ्रेम* केला.
विशेष सरकारी वकील श्री. उज्वल निकम यांनी जुलई 2018 ला माननीय न्यायालयात ड्राफ्ट चार्ज दाखल केला होता ,सात महिन्या पासुन प्रकरण प्रलंबित होते .आज दिनांक 15फेब्रुवारी 2019 रोजीला चार्ज फ्रेम होऊन खटला सुरू झालेला आहे .
दिनांक 17 फेब्रुवारी 2019 रोजी कांबळे दुहेरी हत्याकांडला एक वर्ष पुर्ण होईल , 17 फेब्रुवारी 2018 रोजी आरोपींनी षडयंत्र रचुन उषा कांबळे वय 54 वर्ष व त्यांची चिमुकली नात राशी कांबळे दिढ वर्ष यांचे क्रूरतेने गळे कापुन व दागीने लुटुन यांचे प्रेत तिन किलोमीटर अंतरावर विहिरगाव च्या नाल्यात तागाच्या पोत्यात भरून फेकून दिले होते .
आज सरकारच्या वतीने मुख्य जिल्हा सरकारी वकील श्री. नितीन तेलगोटे यांनी मजबुतीने बाजु मांडली व फिर्यादि तर्फे अधिवक्ता समीर सोनवणे यांनी काम पाहिले व आरोपीच्या वतीने देवेंद्र चव्हाण यांनी वकालत नामा रद्द करून खटला सोडला.