येवला प्रतिनिधी/विजय खैरनार
येवला, ता.२७ : नैसर्गिक आपत्ती मुळे शेती व्यावसाय तोट्यात असल्याने शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुध व्यवसाय करतात.तसेच तरुणांना नौकरी मिळत नसल्याने ग्रामीण भागातील अनेक तरुण दुग्ध व्यवसायाकडे वळले आहे.त्यामुळे दुग्ध व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेतील कणा बनला आहे.मात्र,दुग्धव्यवसायात उत्पादन खर्चही निघत नसल्याने आता हाच दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे.त्यामुळे सरकार ने आता यात लक्ष घावून दुध उत्पादक शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढावा ,अशी मागणी दुग्धव्यवसायिक शेतकर्यांकडून होत आहे.
कोरोणामुळे शेतकर्याच्या कोणत्याही शेतमालास बाजारभाव मिळत नसल्याने अगोदरच चिंतेत असलेल्या शेतकऱ्याला जोडधंदा असलेल्या दूध व्यवसायाला ही बाजारभाव नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. राज्यासह संपूर्ण देशात कोरोणामुळे लॉक डाऊन करण्यात आला होता.लॉक डाऊन होण्याआधी शेतकर्यांच्या दुधाला साधारण तीस ते पस्तीस रुपये भाव मिळत होता.परंतु आता शेतकर्याला दुधाला १९ ते २० रुपये प्रतिलिटर इतका नीचांकी भाव मिळत आहेत. या रक्कमेतून मूलभूत खर्चही भागविणे शेतकर्यांना जिकरीचे झाले आहे.
जनावरांना लागणाऱ्या खुराकाच्या वाढलेल्या किंमती आणि चार्याचा विचार केला तर शेतकऱ्यांना एक लिटर दूध उत्पादनासाठी तब्बल २५ ते ३० रुपयां पर्यंत खर्च येतो. मात्र हेच दूध सध्या २० रुपये लिटर ने विकले जात असल्याने शेतकऱ्यांना लिटरमागे तब्बल दहा रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.त्यामुळे शासनाने त्वरित लक्ष्य घालून शेतकर्यांना या संकटातून बाहेर काढावे अशी मागणी येथील दुग्धव्यवसायिक करत आहे.
🗯
" पाहतांना जास्त जनावर, मोठा गोठा दिसतं असला तरी याच्या मागील मेहनत, खर्च हाही मोठा असतो.जनावरांचे काम करण्यासाठी वेगळा मजूर कामावर ठेवणं शक्य होत नाही त्यामुळे जनावरांना चारापाणी देणे, जनावरांची काळजी, गोठ्याची स्वच्छ्ता करणे, दूध काढणे, काढलेले दूध विक्रीसाठी घेऊन जाणे ही सगळी कामे स्व:ताला व घरातील माणसांनाच करावी लागतात. याचा कोणताही हिशोब किंवा वाटा कोठेही गणला जात नाही.येवढी मेहनत करुन ही पाण्या पेक्ष्या कमी भावात दूध विकावे लागत आहे".
- नानासाहेब आहेर दूध व्यवसायिक , गारखेडा.