प्रतिनिधी , विजय खैरनार
येवला : देवळाणे येथे रात्री ३ वाजेच्या सुमारास बी.आर.काळे यांच्या नावावर असलेले देवळाणे-तिळवणी रोड लगतचे स्वस्त धान्य दुकान नंबर ८५ ,तसेच शेजारील गाळ्यातील नवनाथ गांगुर्डे यांच्या गोडाऊनमधील लग्नसमारंभाला वापरले जाणारे मंडपचे साहित्य जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.
भीषण आग लागल्याने रेशन दुकानातील गहू , तांदूळ साखर,इलेक्ट्रॉनिक काटे टेबल, दप्तर, गल्ल्यातील चार हजाराची रोकड,दुकानाचे पत्रे,शटर तसेच धन्य दुकाना शेजारील गाळ्यातील लग्न समारंभासाठी लागणारे मंडप व्यवसायाचे साठवलेले साहित्य त्यात जनरेटर, शामियाण्याचे छत, पाईप, छत, पडदे, साउंड सिस्टीम, गाध्या चटई,प्लास्टिक ताडपत्र्या, खुर्च्या, या सर्व महत्त्वाची वस्तू जळून खाक झाल्या आहे यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला बोलावण्यात आले होते. परंतु आग इतकी भीषण होती की यामध्ये दोनही दुकानांच्या सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत पंचनामा देखील केला आहे.