जे के लोढा ज्वेलर्स मनमाड यांच्या तर्फे उपक्रम
प्रतिनिधी/विजय खैरनार
येवला : मनमाड येथील प्रसिद्ध ज्वेलर्स
जे. के. लोढा ज्वेलर्स यांच्यातर्फे मातृदीना निमित्त येवला तालुक्यातील कातरणी येथे स्वर्गीय सुशिलाबाई जवेरीलाल लोढा यांच्या स्मरणार्थ जे के लोढा ज्वेलर्स मनमाड चे संचालक सुरेश जवेरीलाल लोढा व नील सुरेश लोढा यांच्या हस्ते
पी.पी.ई , किट ,मास्क ,सॅनिटायझर जंतु नाशक साबण चे वाटप करण्यात आले. लोढा परिवारचे कातरणी हे मुळ गाव आहे. व्यवसाय निमित्त लोढा कुटुंब मनमाड व नासिक येथे स्थायिक झाले आहे. परंतु या लोढा परिवाराला आपले मूळ गाव कातरणी चा विसर पडला नाही. त्यामुळे आपल्या आईची स्मृती ठेवून वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुमन अशोकराव कदम, ग्रामसेवक संजय मनोहर व्यवहारे ,माजी सरपंच लक्ष्मण गंगाधर कदम उपस्थित होते. अशोक कदम व ग्रामसेवक संजय मनोहर व्यवहारे यांनी श्रीफळ देऊन सुरेश लोढा व नील सुरेश लोढा यांचा सत्कार केला. याप्रसंगी ग्रामसेवक संजय मनोहर व्यवहारे यांनी आशा सेविका करता PPE किट चा प्रस्ताव मांडला, त्वरित नील सुरेश लोढा यांनी मागणी मान्य करून एक- दोन दिवसात पाठवतो असे आश्वासन दिले. सुरेश लोढा नी कोरूना ह्या विषाणू बाबत काय काळजी घ्यायची याचे उपस्थितांना मार्गदर्शन केले .याप्रसंगी दशरथ कदम, आप्पासाहेब सोनवणे, कैलास कदम, संपत कदम, सिताराम गांगुर्डे ,विठ्ठल गवळी, दशरथ कदम ,पुंडलिक सोनवणे, दगु सोनवणे, खंडू आहिरे ,संजय कदम व पंचक्रोशीतील बरीच मंडळी सोशल distance ठेवून उपस्थित होते व या कार्यक्रमाने सगळी मंडळी भारावून गेली. ग्रामपंचायत च्या वतीने अशोक कदम यांनी आभार मानले.