सौम्या लक्षण, संशयित असणाऱ्या रुग्णांची होणार देखभाल
संजीव बडोले/नवेगावबांध.
नवेगावबांध:-येथील भागेरथाबाई आत्माराम डोंगरवार विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात 100 खाटांची व्यवस्था असलेल्या कोरोना केअर सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. हे सेंटर ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध च्या देखरेखीखाली असेल. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक हे या सेंटरचे नोडल अधिकारी असतील.
गोंदिया जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार माइल्ड, मॉडरेट व सिवियर या कोरोना संशयित रूग्णांसाठी किंवा लक्षणे असलेला नागरिकांसाठी कोविड केअर सेंटर- 677 खाटा, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर- 580 खाटा व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल-100 खाटांचे उभारण्यात येत असल्याची तसेच जिल्ह्यातील कोणताही व्यक्ती या विषाणूने बाधित होऊ नये. यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष डॉ.कादंबरी बलकवडे यांनी 15 एप्रिलला पत्रकार परिषदेत दिली होती. त्यानुसार कोरोना केअर सेंटर ची स्थापना करण्यात आली आहे. सध्या या कोरोना केअर केंद्रात 50 खाटांची व्यवस्था करण्यात आली असून, लवकरच दुसऱ्या 50 खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे. अशी माहिती आहे. ज्या तालुक्यात दोन ग्रामीण रुग्णालय आहेत. तेथे ते प्रत्येकी शंभर शंभर घाटांची ची व्यवस्था करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौच करण्याची व्यवस्था तसेच आंघोळ करण्याची व्यवस्था उपलब्ध असेल अशा स्थळी हे केअर सेंटर उभारण्यात यावे असे निर्देश देण्यात आले होते. प्रशासनाने गावातील सर्व संस्थांची इमारतीची पाहणी करून येथील बीएडी विद्यालया ची निवड केली आहे. ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी नियमित रुग्णांची असुविधा होऊ नये, याकरिता सदर ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ही व्यवस्था न करता. सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी हे कोरोना केअर सेंटर निर्माण करण्यात आले आहेत.
कोविड केअर सेंटर्स मध्ये केवळ सौम्यलक्षणे असलेल्या किंवा संशयित रुग्णांना ठेवून त्यांची काळजी घेतली जाईल.कोविड केअर सेंटर्स ही तात्पुरत्या स्वरूपाची सुविधा केंद्र असतील. विलगीकरण कक्ष देखील कोविड केअर सेंटर्स मध्ये रूपांतरित केले जाऊ शकतील. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक कोविड सेंटर, कोविड केअर हॉस्पिटल आणि कोविड केअर आरोग्य केंद्र यांची एकमेकांशी सांगड घालावी, जेणेकरुन, कोणता रुग्ण कुठे भरती करायचा याविषयी स्पष्टता राहील.याबाबत आरोग्य मंत्रालयाने एक अत्यंत महत्वाचे निवेदन जारी केले होते. कोविड-19चे रुग्ण आणि संशयित रुग्ण यांच्या व्यवस्थापना संदर्भात मार्गदर्शन करणारे हे निवेदन होते.
या मार्गदर्शक निवेदनात कोविड 19च्या रुग्णांसाठी विविध वर्गवारीत तीन प्रकारच्या उपचार सुविधांविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.
कोविड केअर सेंटर्स मध्ये केवळ सौम्यलक्षणे असलेल्या किंवा संशयित रुग्णांना ठेवून त्यांची काळजी घेतली जाईल.कोविड केअर सेंटर्स ही तात्पुरत्या स्वरूपाची सुविधा केंद्र असतील किंवा मग सरकारी/ खाजगी सुविधा, जसे की वसतिगृहे/ शाळा/ हॉटेल्स इत्यादी; विलगीकरण कक्ष देखील कोविड केअर सेंटर्स मध्ये रूपांतरित केले जाऊ शकतील. प्रत्येक कोविड सेंटर, कोविड केअर हॉस्पिटल आणि कोविड केअर आरोग्य केंद्र यांची एकमेकांशी सांगड घालावी, जेणेकरुन, कोणता रुग्ण कुठे भरती करायचा याविषयी स्पष्टता राहील. असे त्या निर्देशात म्हटले होते.
दुसऱ्या पातळीवरील सुविधा 'कोविड आरोग्य केंद्र'ही आहे. ज्या अंतर्गत, ज्या रुग्णांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे असल्याची वैद्यकीयदृष्ट्या शिफारस केली गेलेली आहे, त्यांच्यावर उपचार होतील. ही केंद्रे रुग्णालये असू शकतात किंवा मग रुग्णालयांमधला समर्पित वार्ड ज्यात संक्रमण पसरणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली असेल.कोविड आरोग्य केंद्रातील खाटांसोबत खात्रीशीर ऑक्सिजनचा पुरवठा असेल.
तिसऱ्या सुविधेअंतर्गत, कोविड समर्पित रुग्णालये असतील, ज्यात कोविडच्या गंभीर रुग्णांची संपूर्ण काळजी आणि उपचार केले जातील.समर्पित कोविड रुग्णालये ही संपूर्ण रुग्णालये किंवा एखाद्या रुग्णालयातील वॉर्ड असू शकेल, जिथे सर्व सुविधायुक्त अतिदक्षता विभाग, जीवरक्षक प्रणाली आणि ऑक्सिजन पुरवठा असलेले बेड असतील
लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी कोरोना केअर रुग्णालये असून सौम्य लक्षणे असलेल्यांसाठी कोरोना हेल्थ सेंटर तर तीव्र लक्षणे असलेल्यांकरिता कोरोना हॉस्पिटल अशी त्रिस्तरीय वर्गवारी केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात येत आहे. कोविड हेल्थ सेंटरही सुरु करण्यात येत असून, सर्व सुविधा अद्ययावत कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. अर्जुनी मोरगाव तालुक्यात नवेगावबांध ,अर्जुनी मोरगाव या ठिकाणी हे कोरोना केअर सेंटर स्थापन करण्यात आल्यामुळे, तालुक्यातील नागरिकांचे देखभाल व उपचार करण्याच्या दृष्टीने सोयीचे झाले आहे. याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.