अतिवृष्टीमुळे नाल्यांना पूर, सावरटोला -पिंपळगाव मार्गावरील वाहतुक दुसऱ्यांदा बंद
Drains flooded due to heavy rains, Savartola-Pimpalgaon route closed for the second time
संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी /गोंदिया
नवेगावबांध:-काल दिनांक २० जुलै दुपारपासून परिसरात पावसाने झोडपले. मुसळधार पावसामुळे परिसरातील नाल्यांना पूर आलेला आहे. काल मध्यरात्रीपासून सावरटोला-पिंपळगाव मार्गावरील नाल्यावर पूर आला असून,नाला दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे सावरटोला, बोरटोला पिंपळगाव मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतूक बंद झाली आहे.परिसरातील नाल्याला लागूनअसलेल्या सावरटोला, बोरटोला, चापटी,सुरगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरले आहे. 12 जुलै च्या पहिल्या पुरानंतर काल मध्यरात्रीपासून नाल्याला आलेल्या पुरामुळे परिसरातील शेती पूर्वीपेक्षा जास्त पाण्यात बुडाली आहे.शेतातील बांध पाण्याने तुडुंब भरली आहेत.१२ जुलैला याच नाल्याला एकदा पूर आला होता.धान पिकांची रोवणी पुरामुळे पुन्हा एकदा आणखी खोळंबली आहेत. धानपिकांचे पऱ्हे व रोवलेले पीक पाण्याखाली आल्यामुळे ते सडण्याची भीती शेतकरी वर्गात व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुन्हा जाण्याच्या रोगणी करिता परे आणायचे कुठून? असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. १२ जुलै चा पूर ओसरल्यावर शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आणलेले शेतातील मोटार पंपाचे पाईपही पुरात वाहून गेले आहेत. तसेच विहिरीला लावलेल्या मोटारी सुद्धा वाहून गेल्यात, तर काही पाण्यामुळे खराब झाल्या आहेत. पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासनाने घटनास्थळाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.अशी मागणी सावरटोला, बोरटोला,चापटी,सुरगाव येथील शेतकऱ्यांनी केली आहे.