राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांची काही दिवसांपूर्वी चौकशी केली होती. आज ईडीने त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. त्यांचं वरळीतील घर जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. वरळीतील सीजे हाऊसमधील चार मजले जप्त करण्यात आले आहेत.
#Maharashtra, #Mumbai #Gondia #NCP leader #Praful Patel
वरळी येथे सीजे हाऊस नावाची मोठी इमारत आहे. या इमारतीच्या बांधकामाआधी त्या जागेवर एक छोटीशी इमारत होती. ही इमारत गँगस्टर इक्बाल मिर्ची याच्या ताब्यात होती. या कंपनीची पुनर्बांधणी प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीने केली होती. त्या मोबदल्यात प्रफुल्ल पटेल यांनी इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबियांना काही जागा आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम दिली असल्याची माहिती आहे. या व्यवहारात गैरप्रकार झालाचा संशय ईडीला आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेलांवर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इक्बाल मिर्ची प्रकरणात ईडीने कारवाई केली आहे. प्रफुल पटेल यांची २०१९ मध्ये चौकशीही झाली होती. इक्बाल मिर्ची प्रकरणी हे आरोप होते. त्यानंतर प्रफुल पटेल यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यानंतर आपलं म्हणणं मांडलं होतं. आता याच प्रकरणात ईडीने चार मजले म्हणजेच प्रफुल पटेल यांचं घर जप्त केलं आहे.
#Maharashtra, #Mumbai #Gondia #NCP leader #Praful Patel