संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२२ एप्रिल:-
जागतिक वसुंधरा दिवस वन विभाग प्रादेशिकच्या वतीने नवेगावबांध वनपरिक्षेत्रात उत्साहात व जल्लोषात, विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वसुंधरा दिनाचे औचित्य साधून गावातून स्वच्छता अभियान,प्रभात फेरी व मोटरसायकल रॅलीचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.
वृक्ष तोड,वाढते प्रदूषण आणि अयोग्य जीवनशैली हेच पृथ्वीच्या सद्य:स्थितीमागील मुख्य कारण आहे. आपल्या एकुलत्या एका पृथ्वीचे संरक्षण करण्याच्या प्रत्येकाच्या जबाबदारीचे स्मरण करून देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे मुख्य उदिद्ष्ट आहे. आहे. ‘माणसाची प्रत्येक गरज पृथ्वी पूर्ण करू शकते, पण हाव नाही’ अशा अर्थाचे महात्मा गांधींचे एक वचन आहे. हवा, पाणी, जंगले यांसारख्या पृथ्वीवरच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा भसाभस अविचारी वापर केल्याने आणि वाढत्या प्रदुषणाचे परिणाम दिसतच आहेत. हे असेच चालू राहिले तर मानवाचेच भविष्य अंध:कारमय आहे हे निश्चित ! याबाबत प्रबोधन करण्यासाठी २२ एप्रिल हा वसुंधरा दिन मानला जाऊ लागला.
वसुंधरा दिनाचे औचित्य साधून गावातून स्वच्छता अभियान,प्रभात फेरी व मोटरसायकल रॅलीचे आयोजन यावेळी करण्यात आले.
वृक्ष आहे हरित वसुंधरेचा प्राण, करून त्यांचे संवर्धन राखू पर्यावरणाची शान. समृद्ध वसुंधरा आहे हे एक वरदान, तिच्या संवर्धनासाठी देऊ सारे योगदान. असा संदेश देत वृक्षांची जोपासना व संवर्धन याविषयी जागृती गावागावात करण्यात आली. तसेच स्वच्छता अभियान ही राबविण्यात आला. येथील हेलिपॅड ग्राउंड वर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी स्वच्छता अभियान राबवून संपूर्ण पटांगणाची केर कचरा काढून साफसफाई करण्यात आली.
नवेगावबांध वनक्षेत्राचे वनक्षेत्र अधिकारी रोशन दोनोडे, सहवन क्षेत्र अधिकारी करंजेकर, सूर्यवंशी, वनरक्षक मिथुन चव्हाण, व्ही.एल. सयाम व समस्त वनकर्मचारी यावेळी उपस्थित होते.