
कोल्हापूर:
अतिक्रमण काढल्याच्या रागातून थेट पोलीस निरीक्षकाच्या घरालाच आग लावल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरमध्ये घडला आहे संजय पतंगे असं पीडित पोलीस निरीक्षकांचं नाव आहे. :आगीत कार जळून राख
भुदरगड पोलीस निवासस्थान हद्दीत आरोपी सुभाष देसाईने अतिक्रमण करून दुकान गाळा काढला होता.ते अतिक्रमण पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी हटवलं. त्याचा राग मनात ठेवून आरोपी सुभाष देसाईनं पतंगे यांना धडा शिकवण्याची धमकी दिली. यानंतर त्याने मंगळवारी (11 फेब्रुवारी) मध्यरात्री पतंगे यांच्या निवासस्थानाला आणि गाडीला रॉकेल ओतून आग लावली. हे लक्षात येताच पोलीस निरीक्षक पतंगे बाहेर आले. त्यांनी आरोपी सुभाष देसाईला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.
ते भुदरगड पोलीस ठाण्यात रुजू आहेत. या आगीत पतंगे यांचं घर आणि गाडीचं मोठं नुकसान झालं. या प्रकाराने भुदरगड तालुक्यात खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर गारगोटीत मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाला असून संशयित आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी दिली.