Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी १३, २०२०

अनुकंपा तत्वातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संवर्गातील पदे भरण्यास शासनाची मान्यता


खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रयत्नामुळे शासनाने परिपत्रक काढले.

चंद्रपूर : 
सार्वजनिक बांधकाम विभागातील पदभरती प्रक्रियेत अनुकंपा धारकांच्या मार्ग आता मोकळा झाला आहे.  खासदार बाळू धानोरकर  व  आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रयत्नाने अनुकंप स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदाची नियुक्ती करण्यात येणार आहे. शासनाने परिपत्रक काडून तश्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे. 
                 अनेक वर्षांपासून स्थापत्य अभियांत्रिकी सहायक अनुकंप धारकांना भारतीप्रक्रियेत सामावून घेण्यात येत नव्हते. त्यामुळे अनेक अनुकंप धारकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. काही दिवसापूर्वी अनुकंपा धारकांनी खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर याना हा गंभीर प्रश्नांची माहिती दिली. या गंभीर प्रश्नांची दाखल घेत खासदार, आमदार धानोरकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी भेट घेऊन अनुकंपा धारकांना अनुकंपा प्रतीक्षा यादीत सामावून घेण्याची मागणी केली. हि मागणी मान्य करीत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी संबंधित अधिकारण्यांना निर्देश दिले. त्यानंतर शासनाने पत्रक क्र. संकीर्ण २०२० / प्र. क्र. २९/ सेवा - ३ / सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई ११ फेबुरवारी २०२० रोजी शासन निर्णय काढून अनुकंपा प्रतीक्षा यादीतील अहर्तधारक उमेदवारांना स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदावर नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहे. यामळे आठ अनुकंपा प्रतीक्षा उमेदवाराच्या पदनियुक्तीच्या मार्ग मोकाळा झाला आहे. या निर्णयातील उमेदवारांनी खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतीक्षा धानोरकर यांचे आभार मानल्या जात आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.