Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी १३, २०२०

धक्कादायक:नागपुरात सर्वेसाठी गेलेल्या महिला डॉक्टरवर ॲसिड हल्ला

नागपूर/ललित लांजेवार:
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील शिक्षिकेवर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना ताजी असतानाच नागपुरात देखील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे,

एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनवर सर्वे करण्यासाठी आलेल्या सर्व्हे टीम मधील महिला डॉक्टरवर एका माथेफिरूने ॲसिड हल्ला केल्याने चांगलीच खळबळ उडाली.ही घटना नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्‍यातील पहलेपार येथे गुरूवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली.नीलेश कनेरे(22, रा. बाजारचौक, सावनेर) असे आरोपी मा्थेफिरूचे नाव आहे.
नागपुरातील तीन डॉक्टर व सावनेर मधील 2 डॉक्टर सर्वेसाठी गेले होते. सर्वे गावात सुरू असताना माथेफिरू युवकाने ॲसिड हल्ला केला. यात डॉ. सोफीया सोमन, सुकन्याकांबळे, शुक्रा जोशी, गवळी सोनेकर व सुरेखा बडे या पाचही जणांवर ॲसिड उडाल्याची माहिती आहे.

घटनेनंतर उपस्थितांनी या माथेफिरू आरोपीला चांगलाच चोप दिल्याचे समजते आहे या घटनेनंतर गावात चांगलेच तणावाचे वातावरण निर्माण झाले.

तर जखमींना नागपुरातील मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच आरोपी माथेफिरू युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महाराष्ट्रात लागोपाठ घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.