चंद्रपूर/प्रतिनिधी:
चांदा क्लब चंद्रपूर तर्फे विदर्भ साहित्य संघ नागपूरच्या सहयोगाने चंद्रपूरभूषण शांताराम पोटदुखे स्मृती समर्पित तीनदिवसीय राज्यस्तरीय साहित्य व संस्कृती महोत्सव दि. २१, २२ व २३ फेब्रुवारी २०२० ला चांदा क्लब ग्राऊंडवर आयोजीत करण्यात आले आहे.
सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता सचिन खेडेकर या संमेलनाचे उदघाटन करणार असून चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री श्री विजय वडेटटीवार विशेषत्वाने उपस्थित राहतील. तीनही दिवसाच्या या महोत्सवाचे अध्यक्ष प्रख्यात कादंबरीकार आणि साहित्यिक डॉ. रविंद्र शोभणे असतील. या महोत्सवाचे स्वागताध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार असतील.
या महोत्सवात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील साहित्यिकांच्या पुस्तकाचे एक विशेष दालनवजा स्टॉल उपलब्ध राहणार असून त्यांच्या पुस्तकाची प्रदर्शनी आणि विक्री राहील. तीनही दिवस हे पुस्तक दालन उपलब्ध राहणार आहे.
आपल्या जिल्ह्यातील लेखकांचा रसिकांना परिचय व्हावा हे यामागचे उद्देश आहे. हे प्रदर्शन सुर्यांश साहित्य व सांस्कृतीक मंच चंद्रपूर च्या वतीने राहील. साहित्यिकांच्या पुस्तकांची विक्री झाल्यास त्याची 50 टक्के राशी लेखकाला देण्यात येईल आणि 25 टक्के राशी सुर्यांश संस्थेच्या उपक्रमांना देण्यात येणार असून वाचकाला पुस्तके 25 टक्के सवलतीत मिळतील.
तरी ज्या साहित्यिकांना आपली पुस्तके स्टॉलवर ठेवायची असेल त्यांनी दिनांक 18 फेब्रुवारी 2020 पर्यंत आपल्या सर्व पुस्तकांच्या किमान 5 प्रति तीनही दिवसाचे सहभागशुल्क 100 रुपयांसह तुषार एजन्सी जनता महाविद्यालयासमोर येथे जमा कराव्यात.. अधिक माहितीकरिता कृपया इरफान शेख यांच्या 9665413821या क्रमांकावर संपर्क करावा .
दिनांक 18 फेब्रुवारी नंतर नोंदणी होणार नाही याची नोंद घ्यावी तसेच सहभाग शुल्काची राशी स्टॉलवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येईल. असे महोत्सवाचे कार्याध्यक्ष डॉ. कीर्तीवर्धन दिक्षित,कार्यवाह सुनील देशपांडे, सहकार्यवाह डॉ. राजीव देवईकर, प्रशांत आर्वे, इरफान शेख, पुस्तक दालन संयोजक गीता रायपुरे आणि महोत्सवाचे प्रसिद्धीप्रमुख श्याम हेडाऊ यांनी केले आहे.