Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, फेब्रुवारी १२, २०२०

पुरोगामीचे साखळी उपोषण 3 ऱ्या दिवशीही सुरूच

शिक्षकांच्या 12 समस्या प्रलंबित
चंद्रपूर:
चंद्रपूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या अनेक समस्या मागील वर्षभरापासून प्रलंबित आहेत, या समस्यांच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हा परिषद चंद्रपूर समोर 10 फेब्रुवारी पासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे आज आंदोलनाचा तिसरा दिवस. 

आज पुरोगामी च्या भद्रावती तालुका शाखेच्या वतीने राजू चौधरी, जगदीश ठाकरे, सुखदेव निरंजने, दिलीप आस्वले, कवडू मत्ते, रवींद्र वाटकर, प्रवीण बेलखुडे,अजय मुसळे, राहुल बीपटे हे शिक्षक आंदोलनाला बसले होते.

परवापासून आंदोलन सुरू आहे मात्र पत्राद्वारे समस्या सोडवू या आश्वासनाशिवाय आंदोलन मिटवण्यासाठी अजूनही ठोस पाऊल प्रशासनाने उचलले नाही, आंदोलनापूर्वीही प्रशासनाने संघटना प्रतिनिधींना चर्चेला न बोलावता फक्त समस्या सोडवू असेच आश्वासन दिले होते मात्र दिलेल्या मुदतीत एक वगळता अन्य प्रमुख समस्या न सोडवल्याने आधी एक दिवसीय धरणे आंदोलन व आता साखळी उपोषण करण्यात येत आहे. 

आदिवासी भागातील शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी, पदवीधर शिक्षकांची वरिष्ठ वेतन श्रेणी, प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी तसेच प्राथमिक शिक्षक व पदवीधर शिक्षकाना निवड श्रेणी, सेवापुस्तक पडताळणी करावी, मेडिकल, जिपीएफ प्रस्तावास कालमर्यादा निश्चित करणे व टोकन पद्धती लागू करणे, 2014 च्या बिएस्सी नियुक्त शिक्षकांना वेतनश्रेणी, डीसिपीएस कपातीच्या हिशोबासह पावत्या द्याव्या, प्रशिक्षणे कमी करावी, विस्तार अधिकारी व मुख्याध्यापक पदोन्नती तात्काळ करावी, शिक्षक समायोजन तात्काळ करावे, शालार्थ वेतन प्रणाली अंतर्गत शाळांकडून हार्ड कापी मागू नये, मासिक वेतन 1 तारखेला करावे या समस्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात येत आहे, यापैकी शिक्षण विभागात टोकन पद्धती लागू केली मात्र वित्त विभागात अजूनही लावली नाही, अन्य समस्या बाबत माहिती मागणे सुरू आहे, अन्य विभागाला पत्र दिले आहे अश्या प्रकारची उत्तरे प्रशासनाने संघटनेला दिली आहेत मात्र मा.मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांच्या हस्तक्षेपाशिवाय प्रमुख समस्या सुटणे अशक्य आहेत. आंदोलन मंडपाला भेट देणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढत आहे. प्रलंबित मेडिकल व जिपीएफ बिलासाठी जिल्ह्यातील अनेक शिक्षक परेशान आहेत. आंदोलनाचे नेतृत्व विजय भोगेकर, हरीश ससनकर, अल्का ठाकरे, रवी सोयाम, निखिल तांबोळी, चंदा खांडरे, लोमेश येलमुले, सुनीता इटनकर हे पदाधिकारी करत आहेत उद्या भद्रावती तालुक्यातील शिक्षक उपोषणाला बसणार आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.