Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, फेब्रुवारी १२, २०२०

हिंगणघाट जळीत प्रकरणातील अँबुलन्स चालकाचे पोलीस प्रशासनाकडून कौतूक

दारोडा गावातील दगडफेकीत निर्भयपणे चालली अँबुलन्स 

संवेदनशील वातावरणात कामी पडली चालकाची संवेदना
वर्धा /प्रमोद पानबुडे
 हिंगणघाट जळीत प्रकरणात दारोडा गाव संतापले असताना संतप्त जमावाच्या दगडफेकीत निर्भयतेने अँबुलन्स पुढे सरकली. दगडफेक आणि लाठीचार्ज चा थरार डोळ्यात साठवत अँबुलन्स चालकाने गाडी पीडितेच्या घरापर्यंत पोहचवली. त्याच्या या धाडसाचे पोलीस प्रशासनाकडून सत्कार करीत कौतुक करण्यात आलेय.

घरापर्यंत पार्थिव पोहचविताना नागपूर येथील रुग्णालयातूनअँबुलन्स घेऊन चालक जयपाल वंजारी निघाले. बुटीबोरी, हिंगणघाट, त्यांनतर दारोडा येथे अँबुलन्स पोहचल्यावर दारोडा येथे चालकाला परिस्थिती विपरीत दिसली. जमावाने महामार्गावर रोखून धरलेल्या अंबुलन्सला वाट मोकळी करून देण्यास जमाव तयार नव्हता, मागण्यांचे नारे लागत होते, अशात खंबीर होत चालकाने अँबुलन्स पुढे सरकवली, अचानक दगडफेक सुरू झाली , पोलिसांनी प्रतिउत्तर देत लाठीचार्ज सुरू केला. पण चालकाने धाडस करीत अँबुलन्स गावात पीडितेच्या घराजवळ पोहचवली.

याच वेळी टीव्ही वर लाईव्ह पाहणाऱ्या चालकाची पत्नी वैशाली जयपाल वंजारी हिला भीतीही वाटत होती. कारण अँबुलन्स चा चालक तिचा पती होता. पती सुखरूप पोहचण्याचीच तिची प्रतीक्षा होती.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.