होणार पुरोगामी विचारांचा प्रसार
संजीव बडोले प्रतिनिधी | नवेगावबांध दि.१९ जानेवारी:-
मराठा सेवा संघाच्या (Maratha Seva Sangh) येथील कार्यालयात मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री सुनील तरोणे यांच्या हस्ते मराठा सेवा संघाचे २०२३ या वर्षाच्या दिनदर्शिकेचे दि.१९ जानेवारी रोज गुरुवारला दुपारी दोन वाजता लोकार्पण करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाला पाहुणे म्हणून, प्रामुख्याने शिवश्री किशोर तरोणे, शिवश्री अमरनाथ मेंढे, पिंपळगाव शिवश्री लैलेस शिवणकर, शिवश्री जयंत झोडे, शिवश्री युवराज तरोणे, शिवश्री कालिदास पुस्तोडे उपस्थित होते.
सदर प्रसंगी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष यांनी आपल्या मार्गदर्शनात सदर दिनदर्शिका ही फक्त तारीख दाखवण्यापूर्तीच नाही, तर शाहू, फुले, आंबेडकर विचारधारा घराघरापर्यंत पोचविण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली.
विविध साहित्यिकांचे लेख व संपर्क क्रमांक तसेच जनजागृती पर कीर्तनकार व प्रवचनकार व्याख्याते यांचे मोबाईल क्रमांक व नावे या ठिकाणी दर्शविलेले आहेत. ही दिनदर्शिका गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील पुरोगामी विचारांचा प्रचार, प्रसार करण्यास महत्त्वपूर्ण कामाची ठरेल, असे मत सुनील तरोणे यांनी व्यक्त केले. (Maratha Seva Sangh)