Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जानेवारी १७, २०२३

नक्षलग्रस्त भागातील किशोरवयीन मुला- मुलींनी केले क्रीडापर्यटनातून मुंबई दर्शन Naxal-affected areas visited Mumbai on a sports tour.

गोंदिया जिल्हयातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील किशोरवयीन मुला- मुलींनी केले क्रीडापर्यटनातून मुंबई दर्शन.

गोंदिया पोलीस व एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्पाचा स्तुत्य उपक्रम.





संजीव बडोले,प्रतिनिधी.
नवेगावबांध:-17 जानेवारी:-
गोंदिया जिल्हयातील अति- दुर्गम नक्षलग्रस्त भागातील किशोर वयीन मुला-मुलींच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तसेच त्यांना राज्यातील औद्योगिक, आर्थीक, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या प्रगतीची माहिती व्हावी ईत्यादी चे दृष्टीने निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक, गोंदिया, अशोक बनकर, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया कॅम्प देवरी यांच्या मार्गदर्शना खाली तसेच विकास राचेलवार, प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प देवरी, यांचे सहकार्याने गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे नाविण्य पूर्ण उपक्रम म्हणून जिल्हया तील नक्षलग्रस्त भागातील युवक/युवतीना मुंबई सहली करीता गोंदिया जिल्हा पोलीस दल व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती योजनेच्या माध्यमाने (मुंबई) दर्शन सहली करीता आणि दिनांक 15/01/2023 रोजी मुंबई, टाटा मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेण्याकरिता नेण्यात आले होते.

त्या अनुषंगाने दिनांक 10/01/2023 ते 16/01/2023 रोजी पर्यंत विद्यार्थी युवक युवती यांनी सहल दरम्यान मुंबई येथील वेगवेगळया पर्यटनस्थळांना भेटी दिल्यात त्यात प्रामुख्याने

मुलांना दादासाहेब फाळके चित्रनगरी,मराठी कलर्स चॅनल वरील मालिका चे लाईव्ह शूटिंग व कलाकारांची भेट

कपिल शर्मा यांचा स्टुडिओ सेट, तारक मेहता का उल्टा चष्मा चा गोकुल धाम स्टुडिओ दाखविण्यात आला.

जुहु चौपाटी, एलिफंटा लेणी, गेट वे ऑफ इंडिया, ताज हॉटेल, हाजी अली दर्गा दाखविण्यात आली.

स्नो वर्ल्ड,नेहरु तारांगण, श्री.सिद्धि विनायक मंदिर, राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान , रानी बाग दाखविण्यात आले. त्याचप्रमाणे मा. पोलीस महासंचालक, यांचे कार्यालय, दाखविण्यात येवून मुलांना पोलीस विभागाची, तसेच डायल 100 , 112 बाबत माहिती देण्यात आली.

त्यानंतर दिनांक 15/01/2023 रोजी मुंबई येथे आयोजित टाटा मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्या करिता जिल्ह्यातील सर्व स्पर्धक मुला मुलींची नोंदणी करून सकाळी 03:30 वाजता मुलांना मॅरेथॉन स्पर्धे करिता कलिना व माहीम दर्गा, CSTM स्टार्टींग पॉईंटवर नेण्यात आले. इतर स्पर्धका सोबत सामिल् करण्यात आले. ज्यात 10 किलोमीटर दौडमध्ये 43 युवक युतींनी, तर 21 किलो मीटर मध्ये 5 स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते.

जिल्ह्यातील 49 युवक युतींपैकी मॅरेथॉन स्पर्धेत एकूण 6 स्पर्धक टॉप 10 मध्ये आले आहेत .तसेच एकूण 48 मुली, मुलांना पदक मिळाले आहेत. सदर स्पर्धेत कु. शारदा मसराम रा. बक्की ह्या मुलीने 42 किलो मीटर मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केले आहे. सहली दरम्यान सर्व युवक युवतीं यांचे अल्पोपहार, राहण्याची, जेवणाची उत्तम सोय विभामार्फत करण्यात आली होती. दिनांक 16/01/2023 रोजी गोंदिया येथे परत आल्यानंतर सर्व सहभागी युवक युवतींचे पोलीस मुख्यालय, कारंजा गोंदिया येथे स्वागत आणि अभिनंदन करण्यात आले.

गोंदिया जिल्ह्याचे वतीने मुंबई सहल व टाटा मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी. युवक / युवतीं चे मा. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, पोलीस उप- अधीक्षक (मुख्या.) दिनकर ठोसरे यांनी पोलीस विभागा कडुन त्यांचे उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत .

तर मुंबई दर्शन सहल, व मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घडवून आणल्या बद्दल* अतिदुर्गम आदिवासी नक्षल प्रभावित भागातील युवक युवतींनी पोलीस विभाग व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी यांनी केलेल्या सहल आयोजन व कार्याचे विशेष आभार मानून मनोगत सादर करून आनंद व्यक्त केला आहे. मुंबई दर्शन सहलीत सहभागी युवक युवतींना त्यांचे स्वगावी सुरक्षितरीत्या सोडण्यात आले आहे.

वरिष्ठांचे मार्गदर्शनात अतीदुर्गम नक्षल ग्रस्त भागातील 35 युवक व 14 युवतीं असे एकूण 49 मुलं, मुली यांना मुंबई दर्शन, सहली करीता व मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घडवून आणण्यासाठी अथक परिश्रम घेवून सहा. पोलीस निरिक्षक नाईक शरणागत, यांचे नेतृत्वात पोलीस अंमलदार मुस्ताक सैय्यद , आशिष वंजारी, नंदू राऊत, भास्कर हरिंखेडे, महिला पोलीस अंमलदार - ज्योती उईके, मंगला प्रधान, यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.