Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जानेवारी १६, २०२३

जुनोना चौक, बाबूपेठ येथे अवैध सावकाराला पकडले | कारवाईत काय सापडले? avaidh savkari Chandrapur Crime

 खाजगी बेकायदेशीर अवैध सावकारी करणाऱ्यावर सहकार विभागाची धाड


जुनोना चौक, बाबूपेठ येथे अवैध सावकाराला पकडले | कारवाईत काय सापडले? avaidh savkari Chandrapur Crime


चंद्रपूर Chandrapur, दि. 16 : चंद्रपूर शहरातील अवैध सावकारी करणारे जुनोना चौक, बाबूपेठ येथील रहिवासी नामे गजराजसिंग खल्लीसिंग ठाकूर यांच्या घरावर सहकार व पोलिस विभागाने संयुक्तरीत्या धाड टाकली. या धाडीत आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली असून संबंधित व्यक्तीवर सावकारी अधिनियम 2014 च्या कलम 16 अन्वये कारवाई केली जात असल्याचे सहकार विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे. avaidh savkari


जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे यांच्या आदेशान्वये, शासनाकडे बेकायदेशीर अवैध सावकारीच्या अनुषंगाने तक्रारदारांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार, गजराजसिंग ठाकूर हे अवैध सावकारी करीत असल्याची माहिती मिळाल्याने चंद्रपूरचे प्राधिकृत अधिकारी तथा सहायक निबंधक एस. एस. तुपट, बल्लारपूरचे एम.डी मेश्राम तसेच सहकार खात्यातील कर्मचारी यांच्या पथकासह अवैध सावकारी करीत असलेल्या व्यक्तीच्या घरी धाड टाकली.  


कारवाईत काय सापडले?

आक्षेपार्ह कागदपत्रांचा शोध घेतला असता शोध मोहिमेत लिहिलेले व कोरे असे 98 स्टॅम्प पेपर, 112 कोरे धनादेश, रेव्हेन्यू तिकीट लावलेल्या 6 पावत्या, रकमेच्या नोंदी असलेले चार रजिस्टर, 10 बँक पासबुक, तसेच अनेक व्यक्तीच्या नावे असलेले मतदान कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, इतर विक्रीपत्र व मालमत्ता पत्र आदी आक्षेपार्ह कागदपत्रे चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली. सदर कागदपत्रांच्या चौकशीनंतर संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करणार असल्याचे निबंधक एस. एस. तुपट यांनी सांगितले.


कोणी केली कारवाई 

सदर कारवाई चंद्रपूरचे जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निबंधक एस. एस. तुपट यांच्या पथकाने केली. या पथकामध्ये सहाय्यक निबंधक सहकारी संस्था बल्लारपूरचे एम.डी मेश्राम, सहकार अधिकारी एस. के. बगडे, प्रशांत गाडे, श्री. जाधव, श्री. भोयर, श्री.सरपाते, श्री. गौरखेडे, श्रीमती सिडाम, श्रीमती दरणे आदींचा समावेश होता.


तक्रार असल्यास कळविण्याचे आवाहन

बेकायदेशीर सावकारीच्या अनुषंगाने काही तक्रार असल्यास जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, चंद्रपूर तसेच तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या कार्यालयात तक्रारदारांनी पुढे येऊन तक्रार दाखल करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे यांनी केले आहे.  avaidh savkari Chandrapur Crime


संबंधित शोध


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.