Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑगस्ट १९, २०१९

मनोजदादा हेच युतीचे उमेदवार - शेखर चरेगावकर



मायणी, खटाव जि. सातारा (सतीश डोंगरे) 
- जावळवाडी येथे ३० लाख रूपये किमतीचे राष्ट्रीय पेयजल योजनेचे भूमिपूजन सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखरजी चरेगावकर यांच्या हस्ते व कराड उत्तरचे महायुतीचे नेते मा.मनोजदादा घोरपडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी सरपंच सौ.अलका चव्हाण, उपसरपंच प्रभाकर इंगळे, चेअरमन संदीप ओगले, खटाव माण साखर कारखान्याचे संचालक युवराज साळुंखे, खटाव माण साखर कारखान्याचे संचालक अँड धनाजी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. या उदघाटन प्रसंगी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात मा.मनोजदादा घोरपडे हेच महायुतीचे उमेदवार असतील फक्त चिन्ह कोणते हे ठरायचे आहे. उमेदवार ठरलेले आहे. असे प्रतिपादन मा.ना.शेखरजी चरेगावकर यांनी केले.
       यावेळी बोलताना मा.मनोजदादा म्हणाले, मागील ५ वर्षामध्ये कराड उत्तर मध्ये काम करत असताना फार मोठया प्रमाणात विकासाचा बँकलाँग पाहण्यास मिळाला. आजही कितीतरी गावांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळत नाही. मुख्यमंत्री राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावाला पिण्यासाठी स्वच्छ पाणी देण्यासाठी काम करत असून त्या माध्यमातून लोकांचे आरोग्य चांगले राहणार आहे. आजपर्यंत जनतेने चांगले प्रेम केले असून येणाऱ्या निवडणूकीमध्ये आपले आशीर्वाद असावेत. त्यातून उतराई होण्याचे प्रयत्न करेन असे आवाहन यावेळी केले.
       यावेळी बोलताना मा.ना.शेखरजी चरेगावकर म्हणाले, कराड उत्तरचे आमदार हे निष्क्रिय आमदार असून मागील २० वर्ष आमदार असताना जनतेच्या प्राथमिक गरजा सोडविण्यास असमर्थ ठरले असून केंद्रात व राज्यात महायुतीचे सरकार असून शासनाच्या माध्यमातून मंजूर कामांचे नारळ फोडण्याचा सपाटा लावला असून ज्या कामाचा आपला संबंध नाही अशा कामाचे नारळ फोडताना लाज कशी वाटत नाही. शिवाय त्याच कार्यक्रमात सरकारच्या विरोधी भूमिका मांडतात म्हणूनच आता जनता त्यांच्या कारभाराला कंटाळली असून मनोजदादां सारख्या उमेदीच्या नेतृत्वाला लोकांची पसंती असून कराड उत्तरमध्ये महायुतीचे उमेदवार हे मनोजदादाच असून आपल्या सर्वांच्या पाठिंब्यावर त्यांना आमदार करायचे आहे. तेव्हा सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन केले. यावेळी मा.महेशबाबा जाधव, मा.इंद्रजीत ताटे, मा.सुधीर शेळके, मा.सतीश काटकर, मा.अमोल चव्हाण, सयाजी जगताप, सुनिल धुमाळ, भिकू शेळके, हणमंत काटकर, आबाजी काटकर, संभाजी काटकर, उत्तम काटकर, धनाजी जगताप, जनार्दन जगताप, बापूराव फडतरे, विक्रम फडतरे, अभिषेक काटकर, रामचंद्र संकपाळ, सुखदेव शेटे, विकास जगताप, अरूण जाधव, शशिकांत शेळके आदी ग्रामस्थ उपस्थित होते. सुञसंचालन सुधीर शेळके यांनी केले. सतीश काटकर यांनी आभार मानले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.