Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑगस्ट २९, २०१९

जयराम स्वामी विद्यालय माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा




मायणी, ता.खटाव जि.सातारा(सतीश डोंगरे)
             खटाव तालुक्यातील प्रतिष्ठित असणाऱ्या वडगाव (जयराम स्वामी) येथील जयराम स्वामी विद्यालय १९८५ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात व भावपूर्ण वातावरणात शाळेच्या प्रशस्त हॉलमध्ये संपन्न झाला या मेळाव्यास १९८५ बॅचेस साधारण ४८ विद्यार्थी तसेच सेवानिवृत्त शिक्षक त्याचप्रमाणे संस्थेचे चेअरमन, सचिव व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
      प्रारंभी विद्यार्थ्यांनी गायलेल्या कारागिरी युद्धा वरील वीर गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी 1985  सालचा विद्यार्थी व व सध्याचे नूतन चेअरमन आणि प्रसिद्ध प्रतीतयश डॉक्टर विकास घार्गे होते तर सचिव आणि प्राचार्य माजी विद्यार्थी आहेत
    प्रारंभी संस्थेचे चेअरमन अध्यक्ष विकास घार्गे यांनी यांनी आपल्या भाषणात सांगितले की भय्यू महाराज, बॉक्सरचे आयएएस अधिकारी किंवा परदेशात राहणारे उच्चशिक्षित पदाधिकारी यांनी पद, पैसा, मान, प्रतिष्ठा असतानादेखील आत्महत्या केल्या याचे कारण ताणतणाव आहे आणि ताणतणावातून मुक्त व्हायचे असेल तर शाळेसारखे व्यासपीठ नाही या शाळेत आम्ही शिकलो वाढलो पण या शाळेला कदापि विसरणार नाही
       यानंतर सौ. जयश्री घार्गे (इंगळे) यांनी सांगितले की आज 35 वर्षांनंतर माझे गुरूजन मला भेटले आहेत या गुरुजनांच्या आशीर्वादाने आम्ही जीवनाची अशीच वाटचाल करीत असून या आधुनिक युगात शाळेला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देणार नाही
     मधुकर जाधव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की लहानपणीच्या आठवणी शिक्षकांचा आदर्श व्यवस्थापनात अमलात आणतो व शिक्षकाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमन करतो आहे 
यावेळी संस्थेचे पदाधिकारी सेवानिवृत्त शिक्षक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला संस्थेच्या इमारतीसाठी प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी शाळेला आर्थिक मदत दिली यावेळी माजी प्राचार्य काशिनाथ दुटाळ, ज्येष्ठ पत्रकार व माजी प्राचार्य दिलीप पुस्तके सर, सौ.कांता चव्हाण तसेच प्राचार्य संजय पिसाळ यांनी आपली मनोगते व्यक्त केली
या कार्यक्रमास सुनील कुंदप, शोभना घार्गे, जयश्री घार्गे, सुवर्णा कुलकर्णी, राजश्री मोरे, जगूताई वाघमोडे, बजरंग थोरात, संजय शिंदे, बापू गुरव, संजय बाबुराव शिंदे, निवास शिंदे, राजू मुरलीधर घार्गे, भरत गुरव, सदाशिव साळुंखे, संजय सोलापूरे, शिवाजी भोसले, इस्माईल संदे, सुभाष सदाशिव घार्गे, संजय निकम, शशिकांत मगर, अरविंद घार्गे, दादा वाघमोडे, नारायण जगताप,सदानंद शिंदे, राजेंद्र घार्गे, मोहन शिंदे तसेच असंख्य माजी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते शेवटी संस्थेचे सचिव अंकुशराव घार्गे यांनी आभार मानले

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.