३५ विविध सामाजिक,राजकीय
संघटनांच्या पाठींब्याने चंद्रपूर बंद
ललित लांजेवार/चंद्रपूर:
राष्ट्रीय स्वयंसेवक संत्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविरोधात समाज माध्यमांवर आक्षेपार्ह सचित्र मजकुर टाकल्याप्रकरणात अटक झालेले बळीराज धोटे यांची मंगळवारी (ता.२७) तुरुंगातून सुटका झाली. यावेळी त्यांचे समर्थक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
या अटकेच्या निषेधार्थ बुधवारी (ता. २८) चंद्रपूर / बंदचे आवाहन करण्यात आले आहे. चंद्रपूर बंदच्या अनुषंगाने सायंकाळी विविध संघटनांची बैठक पार पडली.
याप्रसंगी खासदार धानोरकर यांची उपस्थिती होती. धोटे प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजकीय पक्षांसह सामाजिक संघटना धोटे यांच्या समर्थनार्थ उतरल्या आहेत.
आहे. भाजप सरकार सामाजिक आणि राजकीय कार्यकत्यांविरोधात खोटे गुन्हे दाखल करतात, संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हनन आहे.
ही दडपशाही आहे. त्याच्या विरोधात बंद पुकारल्याचे सहभागी संघटनांचे म्हणणे आहे. बंदमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष बीआरएसपी, संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी, मनसे, बानाई, धनोजे कुणबी समाज संघटना,अख्रिल भारतीय कुणबी संघटना, जनस्वराज्य सेना, विदर्भ तेली संघटन,विदर्भ राज्य आंदोलन समिती,तेलगू समाज संघटना, जनविकास सेना, माळी महासंघ, चंद्रपूर जिल्हा अलुतेदार-बलुत्तेदार संघटना, तैलिक महासभा, बहुजन व्यापारी संघटना, भारतीय बौद्ध महासभा, सत्यशोधक समाज, बामसेफ, भारत मिशन सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, प्रबोधन विचार मंच, अंनिस, विमाशीस, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, कॉन्स्टीटयुशनल एजिटेशन फोरम, बहुजन एम्प्लाईज फेडरेशन, मुस्लीम आरक्षण संघर्ष समिती, भुमिपुत्र संस्था, राष्ट्रीय मुस्लिम हक्क संघर्ष समिती, जिजाऊ रमाई संघटना, समता सैनिक दल, सेवादल, कास्ट्राईब संघटना, डॉ. आंबेडकर प्राध्यापक संघटना, गोंगप, सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट, ओबीसी फेडरेशन, तिरंगा वाहिनी आदींचा सहभाग राहील.