Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल ०२, २०१९

मायणीतील श्री यशवंतबाबा रथोत्सव उत्साहात

श्री सद्गुरू यशवंतबाबा महाराज यांचे रथावरती ३,६३,६२२ रु देणगी जमा 

गेल्यावर्षी पेक्षा २६,९४९ ने वाढ झाली*

मायणी :- ता.खटाव जि.सातारा(सतीश डोंगरे) 

      येथील श्री यशवंतबाबा यांचा रथोत्सव आज मोठ्या उत्साहात  पार पडला. यावेळी हजारो भाविकांनी श्री यशवंतबाबा यांच्या रथाचे दर्शन घेतले.

      ‎प्रारंभी सकाळी ११वा.यशवंबाबांच्या प्रतिमेचे विधीवत पुजन पौरात्य पिठके यांच्या हस्ते झाल्यानंतर विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते रथाचे पूजन करण्यात आले.यावेळी माजी आमदार प्रभाकर घार्गे,माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख ,जि प सदस्य सुरेंद्र गुदगे, वडूजचे नगरसेवक अभय देशमुख. माजी जि प सदस्य बंडा गोडसे,सदाशिव खाडे,वडूज कृषी उत्पन्न बाजार कमिटी चे संचालक किरण देशमुख,माजी संचालक दादासो कचरे,पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के,मंडल अधिकारी महेश चक्के ,तलाठी प्रवीण घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आपल्या प्रस्ताविक भाषणात ट्रस्ट चे खजिनदार सुरेंद्र गुदगे म्हणाले या पुढील काळात मायणी हेआध्यात्मिक केंद्र होण्यासाठी मी प्रयत्नशील आहे  ‎यावेळी हजारो उपस्थित भाविकांना रामराजे नाईक निंबाळकर ,प्रभाकर घार्गे,प्रभाकर देशमुख सुरेंद्र गुदगे यांनी संबोधित केले. यानंतर रथ प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करीत होता .रथापुढे श्री यशवंत बाबा यांची पालखी ,झाज पथक ,बेंजो पथक,भजनी मंडळ,सेवा मंडळ होते,करीत बस स्टँड परिसर,चावडी,नवीपेठ येथून फुलेनगर येथील विटा रस्त्याने चांदणी चौकात आला. येथे गजी नृत्य मंडळ मायणी यांचा गजीनृत्याचा कार्यक्रम झाला,यावेळी भाविकांची मोठी गर्दी याठिकाणी झाली होती.

      ‎यात्रा यशस्वी पणे पार पाडण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती,श्री यशवंतबाबा देवस्थान ट्रस्ट,यशवंतबाबा यात्रा कमिटी,ग्रामपंचायत मायणी यांनी परिश्रम घेतले.वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के यांचे मार्गदर्शनाखाली पी एस आय धरणिधर कोळेकर यांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला होता .यामुळे कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.श्री यशवंतबाबा यांचा रथ चांदणी चौक येथे आल्यानंतर भाविक भक्तांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरा रथ चांदणी चौक मार्गे यशवंतबाबा मंदिरापाशी पोहचला.दरवर्षी प्रमाणे पांडुरंग झगडे यांनी भाविकांना प्रसादाचे वाटप केले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.