Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल ०२, २०१९

धक्कादायक;पत्नी प्रियकरासोबत पडून गेल्याने पतीने २ चिमुकल्यासह केली आत्महत्या

चंद्रपूर/प्रतिनिधी:
पत्नी प्रियकरासोबत पडून गेल्याने पतीने आपल्या २ चिमुकल्या मुलासह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर येथील बल्लारशाह शहरात घडली. विशेष म्हणजे मुलींचा गळफास लावलेला फोटो त्याने पत्नीच्या व्हाट्सअॅपवरसुध्दा टाकला. सदरघ टना सोमवारी रात्री 1 वाजताच्या सुमारास घडली. श्री रूषीकांत कडूपले(४०) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याने 5 आणि 2 वर्षीय मुलींची सुध्दा हत्या केली.

प्राप्त माहितीनुसार रूषीकांत कडूपले हा खुटेमाटे आयटीआय मध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होता. पत्नी प्रगती एका वाहन चालकाच्या प्रेमात पडली होती.पत्नी प्रगती (३२) हिचे एका वाहनचालकासोबत प्रेमसंबंध होते. तिने आपला पती आणि दोन मुलींना सोडून आठ दिवसांपूर्वी प्रियकरासोबत पलायन केले.त्याने तिला घरी येण्यासाठी बर्याच विनवन्या केल्या मात्र ती आली नाही,अखेर आत्म्हहत्या करतानाचे फोटो पत्नीला पाठविले, व तिने तिच्या वडिलांना हि माहिती दिली. प्रगतीच्या वडीलांनी रूषीकांतच्या भावासोबत संपर्क साधला.भावाच्या परीवाराने दार ठोठावला.मात्र तो परियंत सर्व संपले होते,पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. दरवाजा तोडून आत बघितल्यानंतर आतील दृश्य अत्यंत हृदयद्रावक होते. तिघेही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये गळफास लावलेल्या स्थितीत होते.तिच्या या टोकाच्या निर्णयामुळे रूषीकांत खचला होता. यामुळे त्याने आपल्या मुलींसह आत्महत्या केली.

Gavran Cockerel Boiler Poultry Feed Available


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.