मूल- तालुक्यातील मोरवाई-बेलघाटा रोडला लागून असलेल्या शेतात काम करीत असतांना अचानक वाघाने हल्ला केला. सरिता श्रीकृष्ण पाल वय 34 वर्षे राह. मोरवाई ता. मूल असे म्रूतक महिलेचे नाव असून आपल्या शेतात सरिता एकटीच काम करीत होती. वाघाने सरीतावर हल्ला केला त्यावेळी शेजारचा शेतात इतर महीला काम करीत होत्या. परंतु केवळ महीलाच असल्याने त्यासगळ्या घाबरून गेल्या. वाघाने अचानकपणे हल्ला केल्याने स्वाबचावासाठी सरिताला संधीच मिळाली नाही. तिने आरडाओरडा केला. मोरवाई-बेलघाटा रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्याचा कामावर असलेल्या मजुरांना सरीताचा ओरडण्याच्या आवाज आला. ते सगळे आवाजाचा दिशेने धावत गेले. मात्र तो पर्यंत वाघाने सरीताचे प्राण घेतले. लोक धावून आल्याने वाघ तिथून पळून गेला. मोरवाई गावाला जंगल लागुन असल्याने वाघासह इतरही हिंस्त्र प्राण्यांचा नेहमीच वावर असतो. म्रूतक महिलेचा पती ट्रक्टरवर हमालीचे काम करतो.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
शुक्रवार, फेब्रुवारी १४, २०२०
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
नागभीड बस स्थानकावरिल सुलभ शौचालयात न्यावे लागते बिलसरीचे पाणी Bilsari water Nagbhid bus नागभीड बस स्थानकावरिल सुलभ शौचालयात न्यावे लागते
सावली तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मुख्याध्यापक संघाचा उपक्रमनिफद्रा (रविंद्र कुडकाव
अत्याधुनिक शस्त्रे कोणी पुरविली? ट्रायबल फोरम ने प्रश्न केला उपस्थित मणिपूर राज्यातील 'त्या' नराधमांना फासावर लटकवा!ट्
या कारणामुळे अनाथ विद्यार्थिनीला शाळा सोडल्याचा दाखला देण्यास नकार फी न भरल्याने अनाथ विद्यार्थिनीला शाळा सोडल्याचा
चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी तेलंगणा राज्यातून ईव्हीएम मशीन मागविल्या चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी तेलंगणा राज्यातून
गांधी कुटुंबीय तुमच्या सोबत; सोनिया गांधी, राहूल गांधीनी दिला धानोरकर कुटुंबियांना धीर शिरीष उगे (प्रतिनिधी)वरोरा : मी अशा कठीण प्रसंगात
- Blog Comments
- Facebook Comments