संपर्क-रचना २०२०
नागपूर : नागपूरच्या सार्वजनिक बांधकाम विभाग परिसरात आयोजित संपर्क- रचना २०२० प्रदर्शनास नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनास विविध ५० स्टॉल आहेत.
आमदार प्रकाश गजभिये आणि एमएसएमईचे संचालक पी.एम. पार्लेवार यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. यावेळी सा.बां. विभागाचे मुख्य अभियंता उल्हास दबेडवार, सुपर मॉडेल ऑयकॉन प्रविणा दाढे, सा.बां. विभागाचे अधिक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख आदी यावेळी उपस्थित होते.
बांधकाम, आर्किटेक्चर व इंटरियर डिझायन आदीचं सर्वसामान्य व्यक्तिंच्या जीवनात महत्त्व असल्याच आ.
प्रकाश गजभिये यांनी विषद केलं.
या प्रदर्शनाचा अभियंता, बांधकाम व्यवसायिकांसह नागपुरकरांला लाभ होईल, असं दबेडवार म्हणाले. एमएसएमई ही संस्था उद्योजकांचा नेहमी सोबत असते. उद्योजकांना काही अडचणी असल्यास त्या सोडविण्याचा एमएसएमई प्रयत्न करेल, असा विश्वास एमएसएमईचे संचालक पी.एम. पार्लेवार यांनी व्यक्त केला. इतरही मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. याप्रदर्शनात बांधकाम, आर्किटेक्चर व इंटरियर इंडस्ट्रीजचे ५० स्टॉल असून त्यामध्ये विविध वस्तू या बघायला आणि खरेदी करायला मिळतील.
संपर्क- रचनाचे संचालक कैलास कोटवानी, संचालक श्रेया नाथ, अध्यक्ष धर्मेद्र कुमार, उपाध्यक्ष विन्नी मेश्राम, सचिव पियुष शाहू, सहसचिव हार्दिक दवे, सुरज मिश्रा आदींच आयोजनासाठी सहकार्य लाभल.