Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी १४, २०२०

येवला येथे शासकीय आधारभुत किंमतीत मका खरेदी केंद्र सुरु करा

शेतकऱ्यांनी दिले तहसीलदार यांना निवेदन




येवला प्रतिनीधी/ विजय खैरनार
येवला: येवला येथे शासकीय मका खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यांबरोबरच येवला तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन व येवला कृ.उ.बाजार समितीच्या सभापती यांनाही आज शेतकऱ्यांनी निवेदन दिले.

ह्या वर्षी मका या पिकावर लष्करी अळीचा अत्यंत प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांनी वेळोवेळी औषध फवारण्या करुन या नैसर्गिक संकटावर मात करुण मका पीक वाचवले परंतू हे करताना शेतकऱ्यांना अधिकचा खर्चा करावा लागल्याने मोठा आर्थिक नुकसानही सोसावे लागले होते. अशातच अतिवृष्टी झाल्याने हातात आलेल्या मका पिकाचे आणखीच मोठ्या प्रमाणात नुकसानीला शेतकरी वर्गाला सामोरे जावे लागले होते.

अशा अस्मानी संकटावर मात करून शेतकऱ्यांनी कसेबसे सोंगणी करून मका तयार केली आहे, तथा अतिरिक्त झालेला खर्च वसुल व्हावा या आशेवर काही शेतकऱ्यांनी मका पिकाचे भाव वाढतील या आशेने विक्री केलेली नाही. अजुनही आज रोजी अंदाजे ४० ते ४५ % मका अजुन विक्रीअभावी पडून आहे. अशातच नवीन रब्बी हंगामातील मकाही चांगल्या प्रमाणात तालुक्यात चमकत आहे.

काही दिवसां पूर्वी येवला कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात मकाचा दर हा
किमान २०२९ रु.
कमाल २१४५ रु.
सरासरी २१०० रु.
असा वरील प्रमाणे होता तर आवकही सरसरी दररोज हजारो क्विंटल येत होती.
१ ऑक्टोबर २०१९ पासुन ६ फेब्रुवारी २०२० कालावधीत ३,३९,८९५ इतकी आवक झाली होती तर बाजारही स्थिर होते.
मात्र आज रोजी येवला कृषी उत्पन्न बाजार समिति आवारात प्रति क्विंटल दर
किमान १४१० रु.
कमाल १५८५ रु.
सरासरी १५०० रु.
असा झाल्याने प्रती क्विंटल सरासरी तब्बल ६०० रुपये इतकी घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने येवला तालुक्यातील बोकटे येथिल शेतकरी, विविध शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी यांनी आज येवला येथे निवासी नायब तहसीलदार राजेंद्र राऊत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रभारी सचिव व्यापारे, संचालक भास्करराव कोंढरे आणि खरेदी विक्री संघाचे सचिव जाधव यांना तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

आज रोजी तालुक्यातील शेतकरी वर्गाकडे हजारों क्विंटल मका विक्री अभावी अजुन पडून असल्याने लवकरात लवकर शासकिय आधारभूत किंमत १७६० रु. यां दराने मका खरेदी केंद्र सुरु करावे असे निवेदन भाजपा किसान मोर्चा ता.अध्यक्ष संभाजी दाभाडे, येवला तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समिति ता.अध्यक्ष हितेश दाभाडे, भाजयुमो ता.उपाध्यक्ष किरण दाभाडे, प्रहार शेतकरी संघटना ता.अध्यक्ष हरिभाऊ महाजन, प्रहार शेतकरी संघटना ता.उपाध्यक्ष वसंतराव झांबरे, स्वाभिमानी शेतकरी संघटना ता.अध्यक्ष श्रावण देवरे, शेतकरी संघटना ता.अध्यक्ष अरुण जाधव शिवसेना अंदरसुल गटप्रमुख बापूसाहेब दाभाडे, भाऊसाहेब कदम, विजय दाभाडे, सुदामराव दाभाडे, चांगदेव दाभाडे, कचरू साताळकर, नरेंद्र दाभाडे, भानुदास मोरे आदींच्या निवेदन दिले.

चीनमध्ये आलेल्या कोरोना व्हायरस मुळे जागतिक पोल्ट्री उद्योगावर परिणाम झाला असून, मांस विक्रीतही घट झाली असून त्याचा परिणाम मका खरेदीवर झालेला आहे.
-भास्करराव कोंढरे संचालक येवला कृषी उत्पन्न बाजार समिती, येवला
आम्ही सर्व संचालक मंडळ लवकरच शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्याचे कृषी मंत्री मा. दादा भुसे यांची भेट घेऊन येवला तालुक्यातील मका खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न करु.
-दत्तात्रेय आहेर, चेअरमन येवला तालुका खरेदी विक्री संघ, येवला
शेतकरी वर्गाला दिलासा देण्यासाठी शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करावे यासाठी त्वरित येवला तालुक्याचे आमदार तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री भुजबळ साहेब यांची भेट घेऊन साकडे घालू.
- मकरंद सोनवणे सभापती कृषी उत्पन्न उपबाजार समिती, अंदरसुल

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.