Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, फेब्रुवारी १५, २०२०

वाडी येथे संत सेवालाल जयंती साजरी wadi



नागपूर/:प्रतिनिधी
समूह साधन केंद्र वाडी अंतर्गत जि प उ प्रा शाळा, वाडी क्र 1 व 2 येथे केंद्रप्रमुख शरद भांडारकर यांचे अध्यक्षतेखाली श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम संत सेवालाल यांचे फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सहाय्यक शिक्षिका योगिता गुप्ता यांनी प्रस्ताविकातून श्री संत सेवालाल यांचेबद्दल सविस्तर माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रप्रमुख शरद भांडारकर यांनी समाजातील अनिष्ट प्रथा परंपरा व अंधश्रद्धा निर्मूलन अशा बाबींची माहिती देऊन संत सेवालाल यांच्या पासून प्रेरणा घेऊन समाजपयोगी कार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला प्र. मुख्याध्यापक युवराज उमरेडकर व साहेबराव मोहारे,पुरुषोत्तम चिमोटे,राजेश्वर पानतावणे, रुपेश भोयर,माधुरी डांगोरे, ललिता गोंडचर इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन समीक्षा तागडे व आस्था जांभुळे या विद्यार्थीनीनी केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.