Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल ०२, २०१९

महाकाली यात्रा ११ एप्रिलपासून;प्रशासन लागले कामाला

जिल्हाधिकारी कार्यालयात यात्रेचा आढावा
चंद्रपूर/प्रतीनिधी:
संबंधित इमेज
चंद्रपूरची दैवतमाता महाकालीच्या यात्रेला येत्या चैत्र पौर्णिमा म्हणजे ११ एप्रिल पासून सुरुवात होत आहे. यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविक शहरात येतात. या कालावधीत भाविकांची गैरसोय होणार नाही, यादृष्टीने पूर्व तयारीची आढावा बैठक अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी(ता. १) जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.

यात्रिनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून व इतर राज्यातून येणाऱ्या भाविकांना कोणत्याही गैरसोयीचा सामना करावा लागू नये, महाकाली यात्रा महोत्सव योग्य रीत्या पार पडावा, परिसरात भाविकांना वाहतुकीचा त्रास सहन करवा लागू नये व दर्शन सुलभरीत्या घेता येणे शक्य व्हावे, याकरिता विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.वाढत्या तापमानाचा विचार करतानियोजन व्यवस्थेची काळजीपूर्वकआक्षणी करण्यावर भर देण्यात आला.
महाकाली चंद्रपूर साठी इमेज परिणाम
पाणी व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था,रूणवाहिका व आरोग्य सुविधा, दुकानव्यवस्था, स्नानव्यवस्था, वाहतूकव्यवस्था, भाविकांची सुरक्षा व्यवस्था,विद्युत व्यवस्था यावर चर्चा करण्यात बैठकीला वाहतूक पोलिस निरीक्षक किसन शेळके, मनपाचे सहाय्यक आयुक्‍त धनंजय सरनाईक,सुहास जाधव, वाघमारे, महावितरणचेवसंत हेडाऊ, शहर पोलिस निरीक्षकएस. एस. भगत, वैद्यकीय अधिकारीनीलेश तेलतुंबडे आणि महाकाली मंदिराचे विश्‍वस्त हजर होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.