Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल ०२, २०१९

राज्यस्तरीय सूर्यांश साहित्य पुरस्कार २०१८-१९ साठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

संदेश 

चंद्रपुरातील सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच, चंद्रपूर तर्फे मराठी भाषेत प्रकाशित साहित्यकृतींना राज्यस्तरीय सूर्यांश साहित्य पुरस्कार प्रदान केले जात असून सदर पुरस्कार साहित्यक्षेत्रात अतिशय सन्मानाचे मानले जातात. कथा, कविता, कादंबरी आणि नाटक यासाठी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार असून यावर्षीपासून बाल साहित्यासाठीही पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 
📚 स्व. दिलीप बोढाले स्मृती कथासंग्रह पुरस्कार 📚
पुरस्कार प्रदान केल्या जाणाऱ्या वर्षात दिनांक 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या दरम्यान प्रकाशित कथासंग्रहाला सदर पुरस्कार प्रदान करण्यात येतो. 1000 रुपये रोख, सन्मानचिन्ह, शॉल, श्रीफळ, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
💐 अशोकसिंग ठाकूर पुरस्कृत कादंबरी पुरस्कार 💐 
सुप्रसिद्ध इतिहास संशोधक व पुरातत्व संशोधक अशोकसिंग ठाकूर देत असलेल्या निधीतून कादंबरीला हा पुरस्कार देण्यात येतो . 1000 रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शॉल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
💐 शिवाजी चाळक पुरस्कृत कवितासंग्रह पुरस्कार 💐
कवितेसाठी देण्यात येणारा हा महत्वाचा पुरस्कारपुणे येथील ज्येष्ठ कवी आणि रसिक श्री शिवाजीराव चाळक यांच्या वतीने देण्यात येतो. 1000 रुपये रोख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शॉल आणि श्रीफळ असे स्वरूप आहे.
💐 सूर्यांश नाट्यलेखन पुरस्कार 💐 
नाट्यलेखनासाठी देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूपही वरील पुरस्काराप्रमाणे आहेत. 
💐 सूर्यांश बालसाहित्य पुरस्कार 💐
बाल साहित्यलेखनासाठी देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूपही वरील पुरस्काराप्रमाणे आहेत. 
असे राज्यस्तरीय पुरस्कार असून या पुरस्कारासाठी संस्थेच्या प्रतिसादाला आवाहन देत महाराष्ट्रातील मान्यवर साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृती पाठवाव्यात  अशी विनंती करण्यात आली आहे.उपरोक्त सर्व पुरस्काराची निवड साहित्य क्षेत्रातील मान्यवरांच्या निवड समितीद्वारे करण्यात येते.

तरी राज्यस्तरीय कथासंग्रह, कवितासंग्रह, कादंबरी, नाटक आणि बाल साहित्य या साहित्यप्रकारातील पुरस्कारासाठी लेखकांनी किंवा प्रकाशकांनी दिनांक १ जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ या दरम्यान प्रकाशित झालेल्या आपल्या पुस्तकांच्या 2 प्रति

  विवेक पत्तीवार, तुषार एजेंसी, जनता महाविद्यालयासमोर,नागपूर मार्ग चंद्रपूर - ४४२४०२ या पत्त्यावर किंवा संगीता पिजदूरकर सहसचिव, सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच, पोस्टल कॉलोनी, बापट नगर, नागपूर रोड, चंद्रपूर- ४४२४०१* या पत्त्यावर दिनांक * १५ मे २०१९ पर्यंत पाठविण्याचे व अधिक माहितीकरिता संस्थेचे सचिव श्री प्रदीप देशमुख ९४२१८१४६२७ यांच्या या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. सदर पुरस्कार जूलै च्या महिन्यात शेवटी होणाऱ्या समारंभात सन्मानपूर्वक प्रदान केले जातील.
विशेष टीप- प्राप्त साहित्यप्रकारात पाच प्रवेशिका असल्यासच त्या साहित्यप्रकारात पुरस्कार प्रदान केले जातील...
पुरस्कार प्राप्त मान्यवरानी उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारावा. मान्यवर उपस्थित नाही राहल्यास सदर पुरस्कार पोस्टाने किंवा कुरियरने पाठवण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. 

  गीता देव्हारे- रायपुरे
प्रसिद्धिप्रमुख व लोकसंपर्क, 
सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.