Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल ०२, २०१९

ड्रग्सची लत भागविण्यासाठी दोन युवकांनी विद्यार्थांना लुटले


चंद्रपूर- दारुबंदी नंतर ड्रग्सचे साम्राज्य पसरले आहे. असे असले तरी पोलिस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. ड्रग्सची लत लागलेल्या युवकांकडून लत भागवीण्यासाठी चोरी व लुटमारी केली जात आहे. यामुळे चंद्रपूरची शांतता भंग होण्याच्या मार्गावर असून नागरीकांमध्ये दहशत पसरली आहे. त्यामुळे ड्रग्स माफीयांवर तात्काळ आळा घाला अन्यथा आम्ही आमच्या पध्दतीने त्यांचा बंदोबस्त करु असा ईशारा सामाजीक कार्यकर्ते तथा यंग चांदा ब्रिगेटचे संस्थापक, अध्यक्ष किशोर जोरगेवार यांनी आयोजीत पत्रकार परिषदेतून दिला. या पत्रकार परिषदेला दिपक दापके, नगरसेवक विशाल निंबाळकर, डॉ. विद्याताई बांगडे अध्यक्ष, रोटरी क्लब, शाईन शेख, वंदना हातगावकर, सायली येरणे, विद्या ठाकरे, राकेश पिंपळकर, कलाकार मल्लारप, अमोल शेंडे, सुरज चव्हाण, रुपेश पांडे, विनोद अनंतवार आदिंची उपस्थीती होती.

चंद्रपूरातील युवकांना ड्रग्सची लत लावून चंद्रपूर बर्बाद करण्याचे काम काही ड्रग्स माफीयांकडून केल्या जात आहे. दारुबंदी नंतर चंद्रपूरात ड्रग्स पोहचू लागला असून सुरवातीलाच यावर आढा न बसविल्याने त्यांचे प्रमाण आता प्रचंड वाढले आहे. ड्रग्सच्या आहारी गेलेला युवक आता आपली लत भागवीण्यासाठी चोरी व लुटमारीच्या मार्गावर उतरला आहे. काही महिण्यांपुर्वी अश्याच काही युवकांनी चक्क ए.टी.एम. मशीन चोरण्याचा प्रयत्न केला होता. तर रविवारी रात्री मधूबन प्लाजा जवळ दोन युवकांनी दुचाकीने येत क्रिष्णा मंगर व प्रतिक उरकुडे यांची दूचाकी अडवत त्यांच्या गाडीची चाबी काढली व स्वतःच्या गाडीवर बसवून लॉ कॉलेज जवळ नेले. त्यानंतर सुनसान जागा पाहून या युवकांच्या खिशातील पॉकेट काढून दिड हजार रुपये काढले तसेच ए.टी.एम.कार्ड ही हिसकाऊन मारण्याची धमकी देत ए.टी.एम.चा पासवर्ड विचारला सदर युवकांनी भितीपोटी ए.टी.एम.चा पासवर्ड सांगितला त्यानंतर या दोन युवकांनी क्रिष्णाच्या दुचाकी गाडीची डिक्की तपासत त्यात असलेली पेट्रोलची बॉटली हिसकावली तसेच प्रतिक व क्रिष्णाच्या हातात ड्रग्सच्या पुढ्या देवून त्यांचा फोटो काढला. हा फोटो वायरल करु अशी धमकी देत ए. टी. एम. मधून पैसे काढून मागीतले मात्र क्रिष्णा याचा

ए. टी. एम. बंद असल्याने पैसे निघू शकले नाही.

या दरम्यान प्रतिक आणि क्रिष्णा या दोन युवकांनी कशी बशी आपली सुटका करत रामनगर पोलिस स्टेशन गाठले व घडलेल्या प्रकाराची तक्रार दिली आहे. या घटणेवरुन चंद्रपूरची आजच्या गंभिर व चिंताजनक परिस्थीती समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांच्या हाताला रोजगार नाही त्या निराशेतून अनेक युवक अश्या जीवघेण्या लत च्या आहारी जात आहे एकदा या लत च्या आहारी गेलेले युवक आपली नशा भागवण्यासाठी गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारत चालला आहे. उद्याच भविष्य असेलेला चंद्रपूरचा युवा गुन्हेगार बनताना आम्ही पाहन हे चंद्रपूरची संस्कृती नाही. त्यामुळे चंद्रपूरचे भविष्य ड्रग्सच्या आहारी जाण्यापासून वाचवीण्यासाठी आम्ही सुरु केलेल्या ड्रग्स विरोधी मोहिमेमध्ये सहभागी होण्याची गरज आहे. ड्रग्सच्या विक्रीची गुंतलेल्या युवकांची पार्श्वभूमी गुंड प्रवृत्तीची असल्याने यांच्या विरुध्द बोलण्यात नागरिक घाबरत आहे. मात्र आता चंद्रपूरकरांना घाबरण्याची गरज नाही चंद्रपूरकरांना ड्रग्स माफीया धमकावून लुटण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. मागील काही दिवसाआधी चंद्रपूर मधील भिवापूर येथील काही युवक हे ड्रग्स घेऊन नशेमध्ये परिसरातील चार चाकी वाहन चोरी करून घेऊन जुनोना येथील जंगल मध्ये घेऊन गेले त्याची महिती पोलीस व कार मालकाला माहिती होताच त्यांनी कार हि जुनोना जंगल मध्ये त्यांनी ती कार जाळून टाकली त्याचप्रमाणे शहरात मोठ्या प्रमाणात चो-या व घरफोड्या चे प्रकरण सद्या खूप जास्ती प्रमाणात वाढले आहे, अश्या प्रकारच्या घटना शहरात मोठ्या प्रमाणात घडत आहे परंतु प्रशासन याकडे पूर्ण पणे दुर्लक्ष करीत आहे. ड्रग्स माफियांच्या भीती मुळे सामान्य नागरिक पोलीस स्टेशन मध्ये जात नाही त्यांच्या मध्ये सुद्धा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस प्रशासणाने या ड्रग्सचा बंदोबस्त करावा अन्यथा यंग चांदा ब्रिगेटचा सैनीक आपल्या पध्दतीने त्यांचा बंदोबस्त लावेल यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची पुर्ण जवाबदारी ही पोलिस प्रशासनाची असेल असा ईशारा या पत्रकार परिषदेतून किशोर जोरगेवार यांनी दिला आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.