राष्ट्रीय सुरक्षा दिना निम्मित सुरक्षिततेची शपथ घेताना चेअरमन प्रभाकर घार्गे, को-चेअरमन, मनोज दादा घोरपडे , कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे, विनीत यादव आदी मान्यवर
औद्यागिकीकरणामध्ये कामगारांच्या सुरक्षितेला प्राधान्य देणे आवश्यक :- प्रभाकर घार्गे
मायणी :-ता.खटाव जि.सातारा(सतीश डोंगरे)
संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार राष्ट्रीय सुरक्षा दिन यंदा प्रथमच खटाव माण तालुका अँग्रो प्रोसेसिंग लिमिटेड या साखर कारखाना येथे साजरा होत असून हा दिन कामगारांनी सतर्क राहण्यासाठी साजरा करण्यात येत असतो कामगारांनी शिस्तीचे पालन केले कोणतीही अनुचित घटना घडणार नाही .तसेच औद्यागिकीकरणामध्ये कामगारांच्या सुरक्षितेला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे मत चेअरमन प्रभाकर घार्गे यांनी व्यक्त केले .
ते सर्वत्र साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा दिन कार्यक्रमात बोलत होते . यावेळी कारखान्याचे को-चेअरमन मनोज दादा घोरपडे , कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे ,संचालक नंदकुमार मोरे,विक्रम घोरपडे, महेश घार्गे ,टेक्निकल डायरेक्टर बालाजी जाधव ,इज्जाक कंपनीचे सुरक्षा अधिकारी विनीत यादव,अनुप गर्ग,क्षीरसागर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ठिकठिकाणी सुरक्षिततेचे संदेश देणारे फलक लावण्यात आले होते. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ,तसेच सुरक्षा ध्वज यावेळी फडकवण्यात आला सादर वेळी चेअरमन , को चेअरमन , संचालक कारखाना अधिकारी ,सर्व कर्मचारी कामगार यांनी सुरक्षिततेची शपथ घेतली .