भागातील शेतकऱ्यांचे हक्काच्या साखर कारखान्याचे स्वप्न साकार :- नंदकुमार मोरे
मायणी :- ता.खटाव जि.सातारा (सतीश डोंगरे
माजी आमदार व चेअरमन प्रभाकर घार्गे यांनी पाहिलेले दुष्काळी भागातील शेतकऱ्यासाठीचे स्वप्न आज कराड उत्तर चे नेते , को-चेअरमन मनोज घोरपडे यांच्या साथीने पूर्ण होत असून खटाव माण सह कराड उत्तर मधील शेतकऱ्यांचा हक्काचा साखर कारखाना पूर्ण झाला आहे ,असे आनंदउद्गार कारखान्याचे संचालक नंदकुमार मोरे यांनी काढले . ते खटाव माण अँग्रो पडळ च्या प्रथम हंगामातील उत्पादित झालेल्या पहिल्या पाच साखर पोत्यांचे विधिवत पूजन करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात बोलत होते .
यावेळी कारखान्याचे चेअरमन प्रभाकर घार्गे,को-चेअरमन मनोज दादा घोरपडे , कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे ,संचालक नंदकुमार मोरे, बाळासाहेब माने ,विक्रम घोरपडे, प्रदीप विधाते,भास्कर चव्हाण ,कृष्णात शेडगे, महेश घार्गे , अमोल पवार, अँड धनाजी जाधव,युवराज साळुंखे, जयवंत जाधव,आण्णासाहेब निकम,अमोल पवार ,महेश चव्हाण ,टेक्निकल डायरेक्टर बालाजी जाधव आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
नंदकुमार मोरे म्हणाले , खटाव माण हा दुष्काळी भाग गणला जातो आणि या भागातील ऊस उत्पादित शेयकार्याची पाण्याविना ,ऊस दरविना मोठी कुचंबणा होत असल्याचे निदर्शनास येत होते परंतु खटाव माण अँग्रो साखर कारखान्याच्या रूपाने शेतकऱ्याची ही फरफट आता थांबणार असून खटाव माण अँग्रो शेतकऱ्यांना चांगला दर देणार असल्याचेही त्यांनी सांगितल. यावेळी कार्यक्रमास कारखान्याचे अधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.