Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, डिसेंबर २२, २०१९

रस्सीखेच स्पर्धेत प्राथमिक शाळा मायणीची निवड

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मायणी मुले , शाळेची तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धा मध्ये रस्सीखेच स्पर्धेत जिल्ह्यातील स्पर्धेत निवड




मायणी. ता.खटाव जि.सातारा (सतीश डोंगरे)
स्व. यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा तालुकास्तर  सन २०१९ - २०२० मध्ये लक्ष्मीनारायण हायस्कूल , खटाव ता.खटाव जि.सातारा येथे तालुका स्तरांवर घेण्यातआलेल्या स्पर्धेत
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मायणी मुले , शाळेची तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धा मध्ये रस्सीखेच क्रिडा प्रकारात अजिंक्यपदाची हॅट्रीक मिळवून जिल्ह्यातील स्पर्धेत निवड झाली
 यामध्ये कर्णधार हर्षद पाटोळे , साद बागवान , ओंकार सुर्यवंशी , आर्यन झोडगे , जितेंद्र चौधरी , नरेश चौधरी , असद बागवान , पियुष डोंगरे , वरुण पाटोळे , आर्यन कुकडे  इत्यादी मुलांनी चमकदार कामगिरी केली . या सर्वांचे शालेय व्यवस्थापन समिती ग्रामस्थ यांनी कौतुक केले. 

यशस्वी विद्यार्थ्यांना क्रिडा समन्वयक श्री. रामचंद्र जगताप, जयश्री निकम  यांचे मार्गदर्शन लाभले .
यशस्वी विद्यार्थांचे गट शिक्षणाधिकारी श्री .लक्ष्मण पिसे , विस्ताराधिकारी सौ. सुजाता जाधव मॅडम , केंद्रप्रमुख श्री. प्रमोद जगदाळे , शा. व्य. समिती अध्यक्ष व सदस्य , मुख्याध्यापक सौ. उमा वडगांवकर , सर्व शिक्षक वर्ग यांनी अभिनंदन केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.