Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, डिसेंबर २२, २०१९

गडकोटांशी दोस्ती करण्यासाठी आला परदेशी पाहुणा


मायणीतील पोलीस व सामाजिक संस्थेने केले त्याचे केले स्वागत

बेल्जियन अभियंत्याकडून 199 किल्ले सर आता 200वा किल्ला भुषण गड सर करण्यासाठी मायणी त पोलिस ठाण्यात दिला आसरा




मायणी तालुका खटाव /जिल्हा सातारा
 बेल्जियम मधील अभियंता गेल्या दोन ते तीन महिन्यापासून महाराष्ट्र राज्यातील गड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास समजून घेत आहे आत्तापर्यंत त्यांनी 199 गड-किल्ले जाऊन येतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या  काळातील इतिहास व महाराजांचा पराक्रम त्याची राज्यकारभाराची पद्धत रयते विषयी याचा अभ्यास करत आहे  पीटर गेट असे त्याचे नाव असून किमान दोनशे ते अडीचशे किल्ल्यावर जाऊन छत्रपती विषयी कृतज्ञता आणि आदर व्यक्त करायचा आहे असे तो आवर्जून सांगतो पीटर हे बेल्जियम मधील कंपनीमध्ये अभियंता म्हणून काम करत होते दोन वर्षांपूर्वी त्यांनी सेवानिवृत्ती घेतली एका कामासाठी चेन्नई आला व भारतातील निसर्गसौंदर्याची त्याला मोहात पडला आणि तेथील  निसर्ग सौंदर्य पाहण्याचा त्याला मोहन झाला त्यांना छत्रपती शिवाजी महाराजाविषयी माहिती मिळाली त्यांच्या व्यक्तिमत्वाने फिटर भारावून गेला आणि त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळावी तसेच कृतज्ञता आदर व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रातील दोनशे किल्ल्यावर जाण्याचे जाण्याचे फिटर ने ठरवले आणि त्यांची तातडीने अंमलबजावणी केली  फार खर्च येणार नाही ही याची काळजी घेत आहे पाठीवर सेट त्यात दैनंदिन वापराच्या वस्तू छोटासा तंबू आणि दुचाकी घेऊन भटकंती सुरू केली तो  हॉटेलमध्ये न राहता कोणत्याही ठिकाणी जिथे सोय झाली नाही तिथं तंबू ठोकुन तसेच त्यात बंद प्लॅस्टिकच्या बाटलीतील प्लॅस्टिकचा कमी वापर असल्यामुळे गडावर प्लास्टिक नको ही त्यामागची भूमिका आहे आहे फिटर हे धावपटू असल्याने त्याचा फिटनेस प्रचंड आहे  मॅरेथॉनमध्ये त्यांनी भाग घेतला होता  त्याच जोरावर त्यांनी एका दिवसात आठ किल्ले सर करण्याचे ही किमया साधली किल्ले सर करण्याचे ही किमया साधली महाराष्ट्रातील माणसे अगदी प्रेमळ त्यांच्या अगत्यशील असे ते सांगतात अतिथी विषयी त्यांच्यात मनात आदराची भावना दिसून येते कोणाच्याही घरी राहतो तर सकाळी  केल्यानंतर याविषयी तो अनेक आठवणी सांगीतल्या  महाराष्ट्रात राहून आपल्याला पिठलं-भाकरी आवडायला लागली आहे असे ते कौतुक करून सांगतात  ते अजिबात विसरत नाही.




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.