चंद्रपूर/प्रतिनिधी:
धानोरकर यांच्या कार्यालयावर निवडणूक भरारी पथक व प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या धडीचा माझ्याशी संबंध नसल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय गृहराज्यमंत्री व भाजप लोकसभेचे उमेदवार हंसराज अहिर यांनी माध्यमांमध्ये दिले.
शासकीय अधिकारी आपले काम करतात, मी माझे काम करतो हा निव्वळ सहानुभूतीचा विरोधकांचा डाव - असल्याचे हंसराज अहीर यांनी आपली बाजू मांडत स्पष्ट केले.
कुठल्याही विभागाची कारवाई ही त्या विभागाचा स्वतंत्र निर्णय असतो. त्यामुळे ते त्यांचे काम करतात आणि मी माझे काम करतो. खरे तर, भारतीय जनता पार्टीची अशी संस्कृती नाही. अनेक वर्ष मी खासदार आहे, मंत्री आहे, पण कधीही असले प्रयत्न केले नाही. करणार नाही कारण मला त्याची आवश्यकता वाटत नाही, आणि याची परिपूर्ण जाणीव चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील जनतेला आहे. हा केवळ आणि केवळ सहानुभूती मिळविण्यासाठी विरोधकांनी केलेले निराधार आरोप आहे,यात काही तथ्य नाही,
काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांच्या कार्यालयावर घेतलेल्या धाड सत्र सत्ताधाऱ्यांनी केले होते असे काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार परिषदेत म्हणाले, त्यानंतर हंसराज अहिर यांनी धानोरकर यांच्या कार्यालयावर घातलेल्या धाडीचा व माझा काही संबंध नाही हा तर जनतेला दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी आपली बाजू मांडत स्पष्ट केले.