ओबीसीच्या न्याय मागण्या पूर्ण करण्याचं कार्य भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्य आणि केंद्र सरकारतर्फे करण्यात आले आहे. ओबीसी मंत्रालय स्थापन झाल्यापासून आजवर 32 जीआर ओबीसींच्या हितासंबंधीचे जीआर पारित करण्यात आले. भारतीय जनता पक्ष हा ओबीसींना तारणहार ठरणारा पक्ष असल्याने या पक्षात प्रवेश घेतल्याची माहिती ओबीसी नेते प्राचार्य अशोक जीवतोडे (ashok jivtode) यांनी दिली. जनता महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. रविवार, दि. 25 जून 2023 रोजी जनता महाविद्यालयाच्या पटांगणावर दुपारी ३.३० वाजता विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांचा भाजप पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते.
विदर्भाच्या शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे ashok jivtode यांनी July 2021 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. या सोहळ्याला प्रांताध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती होती. मुंबईतील यशवंतराव प्रतिष्ठान येथे बुधवारी हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. (Dr.-Ashok-Jivtode-joins-NCP) मात्र, अवघ्या दोन वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी देत आहेत.
चंद्रपूर आणि विदर्भातील शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज समजले जाणारे डॉ. जीवतोडे यांच्या पक्षप्रवेशाने भाजपचा नवा जवळीक आमदार चेहरा होऊ शकतात. डॉ. जीवतोडे ३५ वर्षांपासून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. १९६७ मध्ये राजुरा विधानसभा क्षेत्रातून त्यांचे वडील दिवंगत श्रीहरी जीवतोडे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. त्यांचे बंधू दिवंगत संजय जीवतोडे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षाशी जुळले होते. ओबीसी मंत्रालयाच्या स्थापनेसाठी नागपूर हिवाळी अधिवेशनात १८ डिसेंबर २०१८ रोजी मोर्चा काढला. त्यात डॉ. जीवतोडे यांनी इतर ओबीसी नेत्यांसोबत मोर्चाचे नेतृत्व केले होते.
पक्ष प्रवेश सोहळ्याला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराजजी अहिर, माजी मंत्री श्रीमती शोभाताई फडणविस, आमदार बंटीजी भांगडिया, आमदार श्री. परिणयजी फुके, आमदार श्री. संजीवजी बोदकुलवार, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. देवरावजी भोंगळे, माजी आमदार श्री. अतुलजी देशकर, माजी आमदार श्री. सुदर्शनजी निमकर, माजी आमदार संजय धोटे, भाजपाचे चंद्रपूर महानगर अध्यक्ष श्री. डॉ. मंगेशजी गुलवाडे तथा भारतीय जनता पक्षातील समस्त आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
पूर्व विदर्भातील या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.