लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान
मुंबई दि ११: राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज सकाळी ७ वा. सात मतदार संघात सगळीकडे मतदानास सुरळीत सुरूवात झाली आहे.
लोकसभा निवडणुक-२०१९ च्या पहिल्या टप्प्यात वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या सात मतदार संघामध्ये सकाळी ७ वा. सुरळीतपणे मतदानाला सुरवात झाल्याची, माहिती मुख्य निवडणूक आधिकारी कार्यालयाने दिली.
लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आयोगाने जनजागृती केली. नागपूर शहरात वास्तव्यास असलेले व्हीआयपी मतदारदेखील ११ एप्रिल रोजी सकाळीच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या कुटुंबासह धरमपेठ हिंदी उच्च शाळा, वनामतीच्या बाजूला मतदान केले . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह भय्याजी जोशी हे भाऊजी दफ्तरी शाळा संघ कार्यालयामागे मतदान केले. भाजपचे उमेदवार नितीन गडकरी सकाळी साडेनऊ वाजता महालस्थित मनपा कार्यालयातील केंद्रावर संपूर्ण परिवारसह, काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले दक्षिण-पश्चिममध्ये श्री र्शद्धानंद अनाथालय र्शद्धानंद पेठ येथे मतदान केलेत. रामटेक लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाने हे इंदिरा गांधी उच्च प्राथमिक शाळा, जवाहर नगर, जुना सुभेदार ले-आऊट, मानेवाडा रोड येथे, काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये गुरुनानक शाळा कडबी चौक येथे मतदान करतील. राज्यसभा खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे विवेकानंद नगर शाळा (एसजेन ऑफिस जवळ) येथे, माजी केंद्रीयमंत्री विलास मुत्तेमवार हे सहपरिवार सरस्वती विद्यालय शंकर नगर चौक येथे, . महापौर नंदाताई जिचकार या पतीसह सकाळी धनगरपुरा तात्या टोपे नगर येथे मतदान केले.