Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, फेब्रुवारी २६, २०१९

वाडीत इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा शांततेत

वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे:



महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा आयोजी इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा रविवार २४ फेब्रुवारी रोजी स्थानिक श्री विश्वनाथ बाबा हायस्कुल व जवाहरलाल नेहरू विद्यालयात शांततेत पार पडली.

केंद्र क्रंमाक ७१०१०३ जवाहरलाल नेहरू विद्यालय केंद्रामध्ये इयत्ता ५ वीचे एकुण २३७ विद्यार्थ्यामध्ये मराठी माध्यम १०१ इंग्रजी माध्यम ८१ ,सेमी इंग्रजी माध्यम ५१ तर हिन्दी माध्यम ४ विद्यार्थ्यांचा समावेश होता यापैकी २२६ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली .मार्गदर्शक प्राचार्य माणीक खोडे , केंद्र संचालक पंकज मानेकर यांनी तर पर्यवेक्षकांची जबाबदारी प्रा .सचिन अतकरी, प्रा .सतिश शरणागत,नितीन सरोदे,मनोहर जाधव,रुपा राठोड, स्वाती मोहोड यांनी सांभाळली .
 
 केंद्र क्रंमाक ७१०१५० श्री विश्वनाथ बाबा हायस्कुल येथे आठवी शिष्यवृत्ती परिक्षेला एकुण २०९ विद्यार्थ्यामध्ये मराठी माध्यम ९० ,सेमी इंग्रजी माध्यम ६७ ,तर इंग्रजी माध्यम ५२ विद्यार्थ्यांचा समावेश होता यापैकी २०७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली .केंद्र संचालक प्राचार्य अनिता टोहरे तर पर्यवेक्षकांची जबाबदारी जयकिशन जयस्वाल,दिलीप तळहांडे,सतीश जयस्वाल,महादेव सदावर्ती,संदीप उपासे, अमोल ब्राम्हण,खुशी गणवीर,कीर्ती चौके,आमिष चव्हाण,योगिता कोल्हे,विवेक चौधरी यांनी सांभाळली.
 
या दोन्ही केंद्रावर परिसरातील प्रगती विद्यालय,विमलताई तिडके विद्यालय,जवाहरलाल नेहरू विद्यालय, द्रुगधामना हायस्कूल ,साईबाबा विद्यालय, स्व .प्रबोधनकार ठाकरे माध्यमिक विद्यालय ,जिंदल पब्लिक स्कुल,माता दिनलाल जयस्वाल स्कूल , श्री विश्वनाथ बाबा हायस्कुल,एंजल किड्स,इंफन्ट कॉन्व्हेंट,ज्ञान विद्या मंदिर,धरमपेठ इंग्रजी माध्यम हायस्कुल ,विदयार्थी विकास विद्यालय अंजनाबाई वानखेडे विद्यालय , राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय , जिल्हा परिषद हायस्कूल जि.प.उच्च प्राथमिक शाळेचा समावेश होता

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.