Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, फेब्रुवारी २६, २०१९

खडगावमध्ये ५४ लक्ष रुपयांच्या विकास कामाचे भुमीपुजन

नागपूर / अरूण कराळे:
 
नागपूर तालुक्यातील खडगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या वार्डातील लेखाशिर्ष २५१५ सिमेंट रस्ता व नाली बांधकाम , जनसुविधा अंतर्गत स्मशान शेड ,हनुमान मंदीर टेकडीवर भक्त निवास , समाज भवन , १४ व्या वित्त आयोगातुन पाणी शुद्धीकरण यंत्र आदी ५४ लक्ष रुपयांच्या विकास कामाचे भुमीपूजन व सत्कार समारंभ शुक्रवार २२ फेब्रुवारी रोजी आ . समीर मेघे यांच्या हस्ते भाजपाचे जिल्हा अध्यक्ष डॉ . राजीव पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला .
 
यावेळी नागपूर पं .स . सभापती नम्रता राऊत , पं .स.उपसभापती सुजित नितनवरे , जि .प. सदस्या प्रणिता कडु , पं .स. सदस्य सुजित अतिकारी ,वाडीचे नगराध्यक्ष प्रेम झाडे , माजी उपाध्यक्ष नरेश चरडे , पुरुषोत्तम रागीट , आंनदबाबू कदम , भोजराज घोडमारे , माजी सरपंच व सत्तापक्ष नेते देवराव कडू , पोलीस पाटील इंद्रराज गोमकार , भुजंग गोमकार, पंकज गोमकार , रोशन ठाकरे , प्रमोद सरोदे ,दवलामेटीचे उपसरपंच गजानन रामेकर, संजय कपनीचोर , नितीन अडसड , विष्णु पोटभरे, नानाजी ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते . सर्वप्रथम पुलवामा येथील सैनीकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवीत हल्ल्यात विरमरण पत्करलेल्या शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली 
 
. परिसरातील नवनियुक्त सरपंच व उपसरपंच तसेच खडगाव मधील नवनियुक्त व मागील सरपंच व उपसरपंच यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . प्रास्तावीक ग्रा.पं. सदस्य देवराव कडु , संचालन मनोज कडु , आभार प्रदर्शन चंद्रशेखर गणवीर यांनी केले .
आयोजनासाठी सरपंच रेखा मून, उपसरपंच किशोर सरोदे, सचिव सुनिल जोशी , सदस्य शितल उईके,सरला कडु, संघमित्रा गव्हांदे, वंदना महल्ले, रेणूका गोमकार, ज्योती ठाकरे, संगीता खुसपरे , गणेश रहांगडाले आदींनी सहकार्य केले . कार्यक्रमाला गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.