चा फटका
बँक ऑफ महाराष्ट्र व स्टेट बँक ऑफ इंडिया मधील प्रकरण
व्यवहार पूर्ण न होताच रक्कम डेबिट झाली
व्यवहार पूर्ण न होताच रक्कम डेबिट झाली
नागपूर / अरूण कराळे:
सध्या भीम अॅप, गूगलपे,फोन पे अशा अनेक नेटवर्किंग मधून रक्कमेचे आदान प्रदान तसेच देयके अदा केली जातात.
सदर ऑनलाईन अॅप वरून अयशस्वी व्यवहाराची रक्कम ग्राहकाचे खात्यातून डेबिट होण्याचे प्रमाणात प्रचंड वाढ झाली असून ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र शाखा धरमपेठ (खाते क्रमांक *******६४६१ ) येथील बचत खात्यामधून २९ डिसेंबर २०१८ रोजी गुगलपे या अॅप द्वारे १० हजार रुपये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चालू खात्यात ट्रान्सफर करण्यात आले पण सदर व्यवहार अयशस्वी झाल्यानंतर ही बँक ऑफ महाराष्ट्र च्या खात्यातून रक्कम कपात (डेबिट) करण्यात आली असून दोन महिने पासून अजूनही रक्कम परत मिळाली नाही अथवा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यात ट्रान्सफर (क्रेडिट) झाली नाही.
सदर बाब बँकेच्या लक्षात आणून देण्यात आली असून तक्रार करून सुद्धा काहीच उपयोग होत नसल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे . शासनाने विशेषतः केंद्र सरकारच्या अर्थ खात्याने अशा व्यवहारांची माहिती घेऊन पीडित बँक खातेदारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी अ भा ग्राहक चेतना मंचचे केंद्रीय सचिव शरद भांडारकर यांनी केली आहे.