वाडी ( नागपूर ) / अरुण कराळे:
श्री संत गाडगे महाराज स्मारक व परीट समाज बहुउद्देशीय संस्था द्वारा संत गाडगे महाराज जयंती कोहळे -लेआऊट मधील संत गाडगेबाबा मंदिर येथे उत्साहात साजरी करण्यात आली.जयंती निमीत्य विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम समाज बांधवांनी स्मारक परीसरात स्वच्छता अभियान राबविले.गाडगे बाबाच्या मूर्तीचे व कलश पुजन ,भजन, रांगोळी स्पर्धा, प्रभाकर महाराज भुसारी यांचे काल्याचे कीर्तन, दहीहांडी ,प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन, गोपालकाला व महाप्रसाद वितरीत करण्यात आला .
मुख्य कार्यक्रम मध्ये साहेबराव शिरपूरकर यांनी संत गाडगेबाबा व सेवानिवृत्त शिक्षिका उज्वला कामरकर यांनी गाडगेबाबाच्या आईच्या वेशभूषा मध्ये महाराजांनी केलेले कार्य ,समाज संदेश ,स्वच्छता ,शिक्षा अंधश्रद्धा नाट्यच्या रूपात सादर केले. याप्रसंगी साहेबराव शिरपूरकर ,वसंतराव हिरुडकर ,मारोतराव काटकर ,संतोष जुनघरे, विजय भोसकर, प्रज्ञा चौधरी ,उज्वला कामरकर,विजय भालेराव,यांचा सत्कार भीमराव भोरकर यांच्या हस्ते करण्यात आला .
रांगोळी स्पर्धेत भाग घेणाऱ्या महिलांना बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा ज्योती भोरकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रधान करण्यात आला .यावेळी नगराध्यक्ष प्रेम झाडे , माजी उपनगराध्यक्ष नरेश चरडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम मंडपे,गणपतराव काळे , राजुताई भोले,नंदा कदम , विजय भालेराव,विजय भोसकर,भोलाशंकर शिरसागर, गौरव शिरसागर ,राजीव गवळी प्रज्ञा चौधरी, दीपक सावरकर ,वंदना केळझलकर, शोभा शिरसागर, अलका बोधनकर,सुनील शिरपुरकर ,गणेश नाकाडे , संतोष रेवाळकर, अतुल खांदाडे प्रामुख्याने उपस्थित होते . संचालन विजय शिरसागर ,आभार प्रदर्शन प्रज्ञा चौधरी यांनी केले