वसतंराव इखनकर यांचे प्रतिपादन
वाडीत श्री चा प्रगट दिन उत्साहात
वाडी ( नागपूर )/अरूण कराळे:वाडीत श्री चा प्रगट दिन उत्साहात
श्री गजानन विजयग्रंथाची एकेकओवी वाचनाने भक्तांना शिकवण मिळते .सामान्य व्यक्तीमध्ये अनेक दुर्गण असतात ते नष्ट करण्याची ताकद फक्त संतांमध्ये आहे . अनेकांना आपल्या दुर्गुणांनी संत सान्निध्याला मुकावे लागते . संतांची निःस्वार्थ सेवा करणाऱ्यांचे संपूर्ण आयुष्य क्षणात बदलते . संत गजानन महाराजांची महीमाच न्यारी आहे . असे प्रतिपादन वसंतराव इखनकर यांनी केले आहे .
शंकरवाडीतील इखनकर भवन मधील श्री संत शिरोमनी गजानन महाराज मंदीरात प्रगट दिन महोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला . त्यावेळी ते बोलत होते . यावेळी सकाळी कलश पुजन, श्री गुरुदेव सेवा मंडळ दत्तवाडी यांचे सुगम संगीत , महीला भजन मंडळ दत्तवाडी यांचे भजन, दुपारी प्रभाकर महाराज केदार यांचे गोपाल काल्यावर किर्तन , संध्याकाळी महाप्रसाद वितरीत करण्यात आला . यावेळी खा . कृपाल तुमाने, संतोष केचे ,वसंतराव इखनकर,वर्षा इखनकर , गोपाल फुले , नेहा इखनकर, पांडुरंग भोपे, प्रभु बनकर , खुशालराव पाटील , सुखदेव मांदाडे , मयूरी इखनकर, दीपक खंगार , नयना खंगार, शालू खंगार , शुभम इखनकर,सुर्यकांत गिरमकर , अॅड .विक्रांत गिरमकर , आकाश गिरमकर , जनार्धन इखनकर , विजय घ्यार , निळकंठ सावरकर आदीसह शेकडो भावीक उपस्थित होते .