Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, फेब्रुवारी २५, २०१९

धनगर समाजाच्या आरक्षणाकरिता मुंबईत मोर्चा

खबरबात / गणेश जैन , धुळे

बळसाणे  :  साक्री तालुक्यातील हाट्टी ( खुर्दे ) येथून धनगर समाजाच्या आरक्षणाकरिता आमदार प्रकाश आण्णा शेंनगे यांच्या नेतृत्वाखाली व माळमाथा परिसरातील समाजभूषण त्र्यंबक दादा पदमोर यांच्या सहकार्याने साधारणतः १५० ते २०० धनगर समाजा चा मोर्चा २५ रोजी मुंबईत पोहचला आणि त्याचदिवशी  हाट्टी गावातील धनगर समाज बांधव मोर्चा काढून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत धनगर समाजाच्या आरक्षणा बद्दल चर्चा करून निवेदन देण्यात येणार आहे या मोर्च्यात माळमाथा परिसरातील धनगर समाजबांधवांचा ही सहभाग असल्याचे  त्र्यंबक दादा पदमोर यांनी सांगितले धनगर समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे यासाठी बळसाणेसह माळमाथा परिसरातील धनगर समाजबांधवांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन मान्यवरांच्या पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला धनगर आरक्षणाच्या मोर्च्यात तोताराम पदमोर , राजेंद्र पाटील , भुषण बागूल , भुषण शिंदे , योगेश धनगर , विठ्ठल महाराज , संजय मासुळे , संजय नरोटे व काऊपाटील आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.