वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे:
डिफेन्स आयुध निर्मानी परिसरात शैक्षणिक तथा व महाराष्ट्राच्या प्राचिन इतिहासाची माहिती मुलांना प्राप्त व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून आयुध निर्मानी डिफेन्स परिसरात राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधत रेती ,माती व दगडांद्वारा -रायगड ,शिवनेरी किल्याची निर्मिती करण्यात आली.
लहान मुलांना इतिहासाची आवड निर्माण व्हावी व शिवाजी महारांजाप्रति आदर निर्माण व्हावा , लहान मुलांना त्यांचा इतिहास कळावा.या उद्देशाने महाराष्ट्र मंडळ परिसरात ऐतीहासीक किल्ल्याची रचना करून किल्ल्याचे प्रदर्शन नुकतेच मंगळवार १९ फेब्रुवारी ते गुरूवार २१ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनीला आयुध निर्मानी परिसरातील विविध शाळेनी व नागरिकांनी भेटी देऊन लाभ घेतला.किल्ले प्रदर्शनी चे आयोजन महाराष्ट्र मंडळाचे सदस्य विशाल देवकर,अभिषेक सावरकर ,तसेच किल्लेदार ग्रुप नागपूर यांचे सहकार्य लाभले.