Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, फेब्रुवारी २०, २०१९

तरुणांनी शिवचरित्राचे अध्ययन केले पाहिजे


शिवश्री प्रा. विकास मराठे


धुळे - दिनांक १९ फेब्रुवारी २०१९ रोजी ह्युमन वेल्फेअर मल्टीपर्पज फाऊंडेशन व अविष्कार कम्प्युटर इंस्टीट्यूट यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात विकास मराठे बोलत होते.
ते म्हणाले, आजचा तरुण भरकटत चालला आहे. आजच्या राजकारणामुळे सर्वात जास्त तरुण पिढीचा वापर होत असतो आणि आपले मूल ह्या राजकारणाचे बळी पडतात. त्याला जबाबदार आपलेच आईवडील असतात. महाराजांच्या वडिलांनी अर्थात शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी स्वत:पासून लांब पाठवले, स्वराज्याच देखणं स्वप्न पाहिले. पण आजचे आईवडील मुलांना लांब पाठवत नाही पण साधी जबाबदारीची जाणीवही करून देत नाही. लहान वयातच जर मुलांना जबाबदारीची जाणीव झाली तर महाराजांचं स्वराज्य आल्यावाचून राहणार नाही. महाराजांनी भरपूर गड – किल्ले जिंकले परंतु आजपर्यंत कोणत्याही शत्रूने गडावर हल्ला करून गड भेडले नाहीत. ह्याच कारण म्हणजे महाराजांनी आपले सरदार व किल्लेदार, राखणदार नेमताना कोणत्याही प्रकारची जात, धर्म पहिला नाही म्हणून त्यांना ते शक्य झाले. पण आजजचे आपले तरुण जात – धर्म व रंगात अडकून पडले आहेत ह्या सर्वस्वी फायदा आजचे राजकारणी घेत आहेत.
अध्यक्षस्थानी बामसेफचे महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र मोरे होते, तर प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष हर्षबोध मोरे तर आभार मीना मोरे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा भदाणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कम्प्युटर इंस्टीट्यूट चे संचालक अविष्कार मोरे यांच्यासह सिद्धार्थ जाधव, शरद अहिरे, भदंत मोरे, सुगत मोरे, प्रवीण महिरे, प्रभाकर देवरे, रवींद्र दामोदर व विक्की मोरे यांनी परिश्रम घेतले

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.