Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च ०४, २०१९

कुुुसुुमाग्रज यांची कविता जितकी तरल तितकीच ठाम:इरफान शेख

चंद्रपूर/प्रतिनिधी:

जगण्याचे विविध कांगोरे कुसुमाग्रजांची कविता सतत धुंडाळत असते. कुसुमाग्रज यांची कविता जितकी तरल आहे तितकीच ती ठाम आहे. ज्या तरलतेने कुसुमाग्रजांनी कविता लिहिल्या तितक्याच खंबीरपणा घेऊन त्यांच्या कविता वाचकांसमोर आल्या आहेत. 

कवी म्हणून तर जेवढे श्रेष्ठ आहे तेवढेच नाटककार आणि माणूस म्हणूनही त्यांनी श्रेष्ठता जपली. कुसुमाग्रज यांची कविता ज्यावेळेस एकप्रकारे समर्पणाचे भाववृत्ती प्रगट करते त्याच वेळी दुसरीकडे जगण्याचे विविध कांगोरे आपल्या कवितेमधून स्पष्ट करते असे प्रतिपादन प्रसिद्ध युवा कवी इरफान शेख यांनी केले. चिंतामणी महाविद्यालय घुगुस तर्फे जागतिक मराठी भाषा दिनानिमित्ताने आणि कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंती निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते मुख्य वक्ता म्हणून बोलत होते.
.
याप्रसंगी मंचावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रवी धारपवार, मराठी विभाग प्रमुख डॉ. माधव कांडणगिरे, युवा कवी आणि राष्ट्रीय पातळीवर सेवा योजना शिबिरात सहभाग दर्शवणारे योगेश भलमे व नवोदित कवी राजेश सोयाम उपस्थित होते. पुढे बोलत असताना इरफान शेख यांनी कुसुमाग्रजांच्या काही कवितांचे दाखले देत कुसुमाग्रजांची कविता अनुभूतीच्या पातळीवर व्यक्तीकडून समष्टीकडे कशी जात असते याचे उत्तम प्रकारे संबोधन केले. त्यानंतर त्यांनी आपल्या कवितेबद्दल सांगितलं. आपलं जगणं, आपलं जीवन कवितेच्या माध्यमातून आपण कसं उलगडत गेलो , कवितेने आपलं बोट कसं ठरलं ,अनेक अडचणी असताना म्ही पुढे कविता सोबतीला असल्याने आपण आपले जगणे कसे सुकर करू शकलो हे सांगताना त्यांच्या काही कवितांचे सादरीकरणही केले. राजेश सोयाम यांनी विद्यार्थ्यांसमोर एक कविता आणि एक गझल सादर केली. तर योगेश भलमे यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करत आपली एक कविता सादर केली. 

आपल्या प्रास्ताविकामधून माधव कांडणगिरे यांनी इरफान शेख यांचा परिचय देत असताना कमी वयात यांनी साहित्य क्षेत्रामध्ये जी प्रगती केली त्या प्रगतीचा उहापोह केला. कमी वयात अभ्यासक्रमात कविता असलेला कवी आज आपल्यासमोर उभा असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला आधी माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. उपप्रचार्य डॉ रवी धारपवार यांनी समयोचित भाषण केले. डॉ. गणेश सुरजुसे यांनी केले.

 तर आभार प्राध्यापक मंगेश जमदाडे यांनी केले. कार्यक्रमाला डॉ नितीन कावडकर, प्रा अविनाश आगाशे, प्रा महेंद्र कुंभारे, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांसह इतर विषयाचेही विद्यार्थी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.