जुन्नर /आनंद कांबळे
आदिवासी दुर्गम भागातील जि. प. प्रा. शाळा कोटमवाडी (हडसर )ता-जुन्नर, जि. पुणे येथे डिजिटल शाळेचे उदघाटन करण्यात आले.
सर्वप्रथम पुलवामा येथे शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली या कार्यक्रमाच्या सुरूवातीस ग्रंथदिंडी काढण्यात आली.
शाळेच्या सर्व माजी विद्यार्थ्यी, नोकरदारवर्गानी शाळेसाठी स्मार्ट T. V-2,tab-4,तसेच दप्तरमुक्त रॅक, 6खुर्ची, मांडणी, प्रिंटर, वाॅटर फिल्टर, ढोलकी, हार्मोनियम पेटी, पाण्याची टाकी, समई, स्पिकर सेट, चप्पल स्टॅन्ड, कुंड्या15 व फूलझाडे15 2टेबल, पाटया 30, कारपेट, असा एकूण 2,30,000 चा निधी शाळेस उपलब्ध करुन दिला.
साहित्य प्रदान कार्यक्रमाचे अध्यक्ष मारुती आबा गवारी, प्रमूख पाहुणे प्रफुल्ल गवारी (इंजिनिअर), मारुती पाल्हू सांगडे(नगरसेवक, पूणे) . भाऊराव भांगरे, सुमन साबळे, सचिन गवारी, अशोक सांगडे, रामचंद्र सांगडे (वि.अ. शिक्षण) विठ्ठल सांगडे(केंद्रप्रमूख) वामन शेळके(केंद्र प्रमुख) नारायण सांगडे (मुख्याध्यापक) शेळके निवृत्ती (मुख्याध्यापक), राजेंद्र मते सर, होनाजी गवारी सर, शंकर शेळके सर, सुनिल गवारी सर,अखिल पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस सुभाष मोहरे सर,अखिल शिक्षक संघटने चे मार्गदर्शक आ.का. मांडवे सर,पोलीस पाटिल, शरद सांगडे , युवराज मुंढे (अध्यक्ष, पेसासमिती) मा. सुरेश शेळके(सरपंच) मा राजेंद्र सांगडे (ग्रा.पं.सदस्य) यांचे उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक मुठे व संदिप तळपे सर व विद्यार्थी यांचेकडे सुपूर्त करण्यात आले.
याप्रसंगी सौ.मंगल गवारी,निवृत्ती महाराज शेळके,माजी सरपंच गणपत तुकाराम गवारी, गणपत मारूती गवारी,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय गवारी , सौ. सुमन सांगडे, सामाजिक कार्यकर्ते जालिंदर सांगडे,भाऊ गवारी, दिगंबर गवारी,ज्ञानेश्वर गवारी,गणपत रुपा गवारी, काशिनाथ शेळके, तुळशिराम मुंढे, यादव तळपे,तान्हाजी लांडे, अशोक शेळके, अंकूश सांगडे,सावळेराम गवारी, पोपट सांगडे,नागेश गवारी, लक्ष्मण शेळके, रोहिदास गवारी, निव्रृत्ती भाऊ गवारी, मारुती गवारी, चंद्रकांत गवारी,सखाराम गवारी,दूंदा शेळके, युवराज शेळके, योगेश गवारी,चितांमण गवारी, लालू गवारी, गूणाबाबा गवारी,या मान्यवरांकडुन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मारूती आबा गवारी यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच गावाच्या परिसरातील अन्य शाळेत असलेली सर्व मुले जूनपासून याच ज्ञानमंदिरात आणावी असे आवाहन केले.
आदिवासी भागातील जनतेला या माजी विद्यार्थ्यांनी एक चांगला आदर्श निर्माण करुन दिला. "डिजिटल शाळेच्या माध्यमातून शाळेच्या गुणवत्ता विकासास मदतच होणार आहे या प्रसंगी दिलेली मदत शाळेसाठी मोलाची ठरली.
माजी विद्यार्थीकडून भविष्यात शाळेसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असे निवृत्ती शेळके(मुख्याध्यापक)यांनी सांगितले.
डिजीटल शाळा व गुणवत्ता विकासासाठी विस्तार शिक्षण अधिकारी सौ.अनिता शिंदे व केंद्रप्रमूख घोटकर यांचे मार्गदर्शनाखाली ही संकल्पना राबविण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप तळपे सर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार शाळेचे मुख्याध्यापक दिलीप मूठे मानले..