Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च ०४, २०१९

हर हर महादेवच्या गजराने दुमदुमली वाडी

वाडी ( नागपूर ) / अरुण कराळे:

येथील मंगलधाम टेकडीवरील सार्वजनिक शिवमंदीर , एमआयडीसी टी पॉईंट जवळील सपनेश्वर सिद्ध मंदीर तसेच वडधामना येथील शिवटेकडीवरील शिवमंदीरात महाशिवरात्रीनिमीत्य सोमवार ४ मार्च रोजी विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले . 

ओम नम् शिवाय , हर हर महादेवच्या गजराने परिसर भक्तीमय झाला . सार्वजनिक शिवमंदीर ट्रस्ट तर्फे मंगलधाम टेकडीवरील शिवमंदीरात सार्वजनिक शिवमंदीर ट्रस्टचे अध्यक्ष तथा वाडी भाजप मंडळाचे उपाध्यक्ष कमल कनोजे , सचिव सीमा कनोजे ,विक्रम तिजारे, चंद्रशेखर देशभ्रतार ,जितेंद्र राहांगडाले , जितू तांडेकर , किसन बांते , बापू निमकर , देवराव निकम , वसंतराव घडीनकर, सुरेश विलोनकर , धमेंद्र कनोजे ,अमीत हुसणापूरे , मंगेश काचोरे, देवाजी खाटीक ,पुरुषोत्तम गोरे, जेम्स फ्रान्सीस, सुकलाल पटले , शेरसिंग पटले , सुषमा गौर, माधुरी ठाकरे , सुचिता घोडे यांच्या उपस्थितीत होमहवन करण्यात आले . यावेळी आ . समीर मेघे , नगराध्यक्ष प्रेम झाडे , नरेश चरडे , केशव बांदरे , कैलाश मंथापूरवार , मनोज रागीट ,मानसिंग ठाकूर , राकेश मिश्रा, दिनेश कोचे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती करण्यात आली .

वाडीतील सपनेश्‍वर शंकर मंदिरात सकाळी महापूजा, होम हवन ,अभिषेक व महाआरती करण्यात आली .यावेळी मसाला दूध व प्रसाद वितरीत करण्यात आला . यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख तथा बांधकाम सभापती हर्षल काकडे , विजय मिश्रा , क्रान्ती सिंग , डॉ . संजय टेकाडे प्रामुख्याने उपस्थित होते .आयोजनासाठी सुरेश कुमकुमवार, दिपक हिरणवार , राजेन्द्र चौधरी, सुरेश सिरसवार, मोहन पाठक, बबलू ढाकरिया, कमलेश हिरणवार, दिनेश चौधरी, मोहन सिरसवा, गणपत रागीट, सतिश सिंग , अनील बारई , सुरेश तांबट आदींनी सहकार्य केले . गजानन सोसायटीमधील क्रिडा मैदानावर बर्फाच्या शिवलिंगाची स्थापना करून शिवभक्तांनी मसाला दूधाचे वितरण केले . आयोजनासाठी राजेंद्र वाघमारे, केशव बांदरे, मानसिंग ठाकूर, संजय जीवनकर, शेखर ढोले, विलास माडेकर , अभय कुणावार , क्रिष्णा रायबोले , तेजस वाघमारे, रविंद्र रघटाटे, प्रभुजी भोयर आदींनी सहकार्य केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.