Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च ०४, २०१९

कँसर ग्रस्त महिलेची वानाडोंगरी न.प.ने चालविली पायपिट

भूखंड नियमिती करनाचे शुल्क भरूनही आरएल नाही 
वानाडोंगरी नगर परिषद चा अजब कारभार गजब 
नागपूर / अरुण कराळे:

हिंगणा विधानसभा क्षेत्रातील ग्रामपंचायत असलेली वानाडोंगरी नगर परिषद झाली आता चांगल्या नागरी सुविधा मिळतील या आशेवर लोकांनी नगर परिषद झाल्याचे चे स्वागत केले. नगर विकास खात्याच्या नियमानुसार अनियमित भूखंड नियमित करण्यासाठी प्रशासन शुल्क व विकास शुल्क आकारुन नियमित करण्यासाठी आरएल हस्तांतरण पत्र दिल्या जाते व मालकी कायम केल्या जाते. लालमनी केदारनाथ गोंड नगर परिषद प्रभाग क्रमांक ५ राजीवनगर निवासी यांनी आपला भूखंड नियमित करण्यासाठी रितसर आवेदन नगर परिषद प्रशासना कड़े केले.

 स्व :ताच्या मालकी हक्काची कायदेशीर नोंदनीकृत असलेली सर्व कागदपत्रे सोबत जोडली त्यांच्या अर्जाची न.प. ने तपासणी करुण मागणी पत्र काढण्यात आले त्या नुसार ती रक्कम त्यांनी दिलेल्या वेळेत भरना करण्यात आली परंतु दोन महीने झाले आरएल पत्र नगर परिषद कडून अद्याप त्यांना प्राप्त झाले नाही.

 त्यामुळे लालमनी गोंड यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.नगर परिषद वानाडोंगरीचा हा अजब कारभार गजब असून अधिकारी, कर्मचारी आणि न.प. पदाधिकारी यांनी या प्रकरणाची दख़ल घ्यावी स्वच्छ नगरा सोबतच स्वच्छ प्रशासनाचा आपला असलेला अनुभव नागरीकांना द्यावा अन्यथा येणारा काळात या अजब-गजब कारभारा विषयी लोक रस्त्यावर येतील हे आपन लक्षात घेतले पाहीजे आणि विशेष म्हणजे सदर महिला पीड़ित महिला ब्लड कँसर ने ग्रस्त आहेत.उपचार सुरु आहेत.

 अशातही आरएल साठी त्यांची वानाडोंगरी नगर परिषद कार्यालयाकडे याचने सह पायपिट सुरु आहे. ति थांबवावी अशी मागणी महीलेंनी नगर परिषद प्रशासनाकडे केली आहे

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.