Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च ०४, २०१९

वाडीत शिवसेनेच्या शाखांचे उदघाटन

वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे:

येथील वार्ड क्रमांक ४ मधील दौलतवाडी व वार्ड क्रमांक १४ मधील हरी ओम सोसायटी मध्ये शाखांच्या फलकाचे अनावरण करुन शिवसेनेच्या शाखा उदघाटीत करण्यात आल्या .उपजील्हाप्रमुख दिलीप माथनकर हिंगणा विधानसभा सहसंपर्क प्रमुख दिवाकर पाटणे , तालुकाप्रमुख संजय अनासाने यांचे हस्ते फलकाचे पूजन करुन फलक अनावरन करण्यात आले. 

यावेळी जय भवानी , जय शिवाजीच्या घोषणा देण्यात आल्या.उपतालुकाप्रमुख रुपेश झाडे , शहरप्रमुख प्रा.मधु माणके पाटिल ,हरीशभाई हिरणवार , वसंतराव ईखनकर, शत्रुघ्नसिंह परीहार यांच्या हस्ते वार्ड क्रमांक ४ चे नवनियुक्त शाखाप्रमुख अजय ईखार , वार्ड क्रमांक १४ चेनवनियुक्त शाखाप्रमुख जगदिश पटले व शाखा पदाधिका-यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करण्यात आले.यावेळी शहरातील एकुण २५ वार्डाच्या शाखेची बांधनी झाली असुन काही दिवसा शाखांच्या फलकाचे अनावरण करण्याचे नियोजन असल्याचे शहरप्रमुख प्रा. मधु माणके पाटिल यांनी सांगीतले.

संचालन प्रसीद्धी प्रमुख दिपक रहांगडाले व प्रस्तावना मिडीया प्रमुख गिरीश राऊत यांनी केले.यावेळी महाराष्ट्र वाहतुक सेनेचे भाऊराव रेवतकर , व्यापारी सेनेचे अजय चौधरी , संदिप उमरेडकर ,अमोल कुरडकर , सुनिल मंगलानी ,उपशहरप्रमुख शब्बीर शेख , राजा आय्यर , विभाग प्रमुख - संदिप विधळे,दिवानजी रहांगडाले , दत्ता वाघ ,संतोष केशरवानी ,नवनाथ बागवाले , विनोद अतकरी ,चंदन दत्ता, प्रमोद जाधव ,अँड. अरुण तैले ,दिनेश तीवारी , अमोल सौंसरे , जयपाल बडगे ,योगेश व्यास ,अश्विन च-हाटे , भट्टाचार्य , श्यामालाल सकलानी , योगेश्वर दांडेकर ,अजय देशमुख , उमेश महाजन , अजय विश्वकर्मा ,महेश पिंगळे ,सचिन गोडबोले , नितेश धोटे ,गुणवंत राऊत,सागर साठवने , लक्षिमन साठवने ,रामेश्वर होले , श्री ढेंगे ,अजय कठाने ,चंदन पटले ,दौलत ठाकरे ,मोहसीन खान ,विरेन्द्र मिश्रा ,राजेन्द्र बिसेन , आकाश राऊत ,सरोज चौधरी,शुभम ठाकरे ,गोलू टेंभरे , रिंकू उचेबगले इत्यादी सह असंख्य पदाधीकारी व शिवसैनीक उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.